लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरातील व ग्रामीण भागातील गंजलेले, वाकलेले खांब नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या खांबामुळे दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र महावितरण उपाययोजना करण्यास उदासीन दिसत आहे.पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उभे केलेले खांब गंजलेले आहेत. काही खांबावर वाहन धडकल्याने ते वाकलेले आहेत. हे खांब पुन्हा दुरूस्त करण्यातच आले नाही. शहरासह तालुक्यातील अनेक गावात विद्युत खांब वाकलेले आहेत. काही खांब बुडातून गंजलेले आहेत, असे खांब कधी कोसळतील, याचा काही नेम नाही.अनेक वर्षांपासून हे खांब उभे आहेत. मात्र वीज पुरवठा यंत्रणाच आता जर्जर झाली आहे. अनेक ठिकाणी खांबावरील तारा लोंबकळल्या आहेत. याबाबत महावितरण प्रचंड उदासीन आहे.
पांढरकवडातील वीज पोल झाले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST
पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे.
पांढरकवडातील वीज पोल झाले धोकादायक
ठळक मुद्देखांब वाकले : महावितरणकडून उपाययोजनेबाबत अक्षम्य दुर्लक्ष, अपघाताची शक्यता