शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे

By admin | Updated: November 17, 2015 04:05 IST

या गजलमधून जणू काही गजलनवाजांनी आपला संगीतमय प्रवास उलगडून दाखविला. मराठी गजलेला साता समुद्रापार

यवतमाळ : आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहेतू भेटसी नव्याने, बाकी जुनेच आहेतू प्रेम दे जगाला, मग ते तुझेच आहेया गजलमधून जणू काही गजलनवाजांनी आपला संगीतमय प्रवास उलगडून दाखविला. मराठी गजलेला साता समुद्रापार सन्मान प्राप्त करुन देणारे पं. भीमराव पांचाळे यांची प्रकट मुलाखत रविवारी १५ नोव्हेंबरला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात झाली. सम्यक सृजन यवतमाळ प्रस्तुत गजलगौरव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नवोदित गजलकारांचा मुशायराही यावेळी सादर करण्यात आला. जगदीश भगत यांनी पं. भीमराव पांचाळे यांची मुलाखत घेतली. त्यातून भीमराव पांचाळे यांनी संगीत जीवनातील अनेक चढउतार सांगून रसिकांची जिज्ञासा पूर्ण केली. ते म्हणाले, कष्टाशिवाय कोणीच प्रगती करीत नाही. म्हणून कष्टाला उगाळत बसू नये. संगीताचे प्राथमिक धडे मी गावकुसातून, निसर्गातून, आईवडील, कोरकूंची गाणी, महादेवाची गाणी आणि लोकगीतातून घेतली आहेत. भजने, जात्यावरच्या ओव्या यातून सुंदर निर्मळ स्वर मी ग्रहण केले. अमरावतीला शिकत असताना सुरेश भट जयस्तंभ चौकात रिक्षात बसून पहाडी आवाजात गजल गात होते. त्याचवेळी माझ्या जीवनाची दिशा ठरली. सुरेश भटांच्या गजलांना चाली लावता-लावता बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिरात मी चांगलाच प्रसिद्धीस आलो. १९७२ साली सर्वप्रथम अकोला येथे ४५ श्रोत्यांसमोर एका वर्गखोलीत मैफल सादर केली. त्याच वर्षी नागपूर आकाशवाणीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून पहिला आलो. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेच नाही.गरिबांच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय?महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय?रक्त लाल आहे सर्वांचे कशास मग ही भेदभावनासंगळ्यांना मातीतच जाणे कुणबी काय माळी काय?ही गजल गाऊन त्यांनी सामाजिक भाष्य गजलमधून व्यक्त केले. सृजनाच्या प्रक्रियेतून कलावंत बाहेर पडला की त्याच्या कलेवर रसिकांचा अधिकार असतो. त्यामुळे आप सर्वांनी एकमेकांशी सलोख्याने वागले पाहिजे. माधव ज्युलियन आणि सुरेश भटांनीच मराठी गजलेला अमृतसिंचन दिले आहे. या क्षेत्रात मी पुढे असून तर जवळपास ४०० गजलकार माझ्या संपर्कात आहेत असेही ते म्हणाले.नवोदित गजलकारांसाठी कायमस्वरुपी कार्यशाळा स्थापन करुन मराठी गजल अधिक प्रगल्भ करण्याची त्यांची मनिषा आहे.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विदर्भातील नवोदित गजलकारांचा मुशायरा झाला. यात आबेद शेख, गजानन दरोडे, डॉ. सुबोध निवाणे, प्रमोद संबोधी, प्रमोद चोबीतकर, विनय मिरासे, प्रा. सिद्धार्थ भगत, किशोर बळी, किरण मडावी, गजानन वाघमारे, मसूद पटेल, विद्यानंद हाडके, प्रफुल्ल भुजाडे, रमेश सरकटे, लक्ष्मण जेवणे, अनिल कोशे यांनी सहभाग नोंदविला.हात तिचा मुद्दाम टाळला धरता धरताचला म्हणालो त्रास कशाला मरता मरतागजानन दरोडे यांच्या गजलेने अक्षरश: रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी धरती बळी खैरे हिने ‘मी किनारे सरकाताना पाहिले’ ही गजल तर प्रिया पाटील हिने ‘श्वास गजल निश्वास गजल जगण्याचा विश्वास गजल’ सादर केली. प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र खैरे कुुटुंबीयांतर्फे गजलनवाजांना भेट देण्यात आले. प्रा. रुद्रकुमार रामटेके यांचे ‘एक स्वप्न बौद्धमयचे’ या सिडीचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. दिवाळीच्या उत्तरार्धात पं. भीमराव पांचाळे यांची दिलखुलास मुलाखत आणि नवोदितांचा मुशायरा दिवाळीच्या फराळाने जड झालेल्या पोटांना गजलानंदाचा उतारा ठरला, हे नक्की. (सांस्कृतिक प्रतिनिधी)