शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील मृत शेतकऱ्याच्या मुलीचे थेट राष्ट्रपतींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:50 IST

यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले.

ठळक मुद्देगावकरी पाठवणार एक लाख पत्रमाझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याला नव्या नाहीत. पण परवा एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. तीन दिवस या शेतकऱ्याचा मृतदेह ताटकळत राहिल्यावरही सरकारकडून दखल घेतली गेली नाही. अखेर मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले. तिच्या पाठोपाठ आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येत राष्ट्रपतींना एक लाख पत्र पाठविण्याची मोहीमच उघडली आहे.देशाला लोकशाही देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावात ही मोहीम सुरू करण्यात आली.राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या करताना ‘माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील’ अशी चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यावरून त्यांची मुलगी जयश्री चायरे हिने घाटंजी पोलीस ठाण्यात नरेंद्र मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रारही नोंदविली आहे. तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने गुन्हा दाखल होईपर्यंत आणि कुटुंबीयांना एक कोटीची मदत होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र तीन दिवस ताटकळत राहिल्यावरही सरकारने दखल घेतली नाही. अखेर माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना राजी केले.परंतु, अद्यापही न्याय न भेटल्याने शंकर चायरे यांची बीएससी करत असलेली मुलगी जयश्री हिने थेट पंतप्रधानांच्या निषेधाचे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस तिने निवडला. शनिवारी राजूरवाडी गावातीलच छोट्याशा पत्रपेटीत तिने राष्ट्रपतींच्या नावे पोस्टकार्ड टाकले.माझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार आहेत, असे लिहितानाच जयश्रीने या पत्रात वडीलांच्या दैनावस्थेची कहाणी मांडली आहे. चायरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अख्खे राजूरवाडी गाव यावेळी तिच्यासोबत उपस्थित होते.तसेच शेतकरी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार उपस्थित होते. जयश्रीनंतर लगेच एका रांगेत येऊन प्रत्येक गावकऱ्यानेही राष्ट्रपतींना पत्र पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध पवित्रा घेणे आणि त्यासाठी चक्क राष्ट्रपतींना साकडे घालणे, या प्रकारामुळे सध्या जिल्ह्याचे राजकीय वर्तृळ ढवळून निघाले आहे.

महिनाभर चालणार पत्रमोहीमपंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देत यवतमाळचा दौरा ऐनवेळी रद्द केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याही निषेधाचे एक लाख पत्र राज्यपालांना पाठविण्यात येत आहे. ही मोहीम आम्ही १४ एप्रिल ते १४ मे अशी महिनाभर राबविणार आहोत. रोज शेकडो पत्र मिळाल्यावर तरी व्यवस्थेला शेतकऱ्यांची परिस्थिती कळेल, अशी आशा जयश्री शंकर चायरे आणि शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या