शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चलो दिल्ली... साक्षरतेची गाडी निघाली दिल्ली दरबारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 06:58 IST

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवस राष्ट्रीय मेळावा

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्रसह देशभरात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. आता या कार्यक्रमात साक्षरतेचे धडे घेत असलेल्या प्रौढांचा दिल्लीत राष्ट्रीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातील चौघांची तिकीट प्रशासनाने पक्की केली आहे. राज्यातून एकंदर २० जणांचे पथक मेळाव्यात सहभागी होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राष्ट्रीय बाल भवनात ६ आणि ७ फेब्रुवारीला हा मेळावा होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षक यात सहभागी होत आहेत. ते ५ फेब्रुवारीलाच दिल्लीत दाखल होणार आहेत. नवसाक्षर आणि असाक्षरांचे अनुभव प्रकटीकरण, स्वयंसेवकांचे चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम या मेळाव्यात होणार आहेत. 

या जिल्ह्यातून सहभाग महाराष्ट्रातून पुणे, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून या मेळाव्यात चार अधिकारी, दोन असाक्षर, दोन स्वयंसेवक, दहा कलाकार आणि दोन विशेष निमंत्रित अशा २० जणांचे पथक सहभागी होत आहे. 

पथक सादर करेल साक्षरतेवर हिंदी पोवाडाnमेळाव्यात कोल्हापूर डायटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार यांच्या नेतृत्वात दहा जणांचे कलापथक साक्षरतेवर हिंदी पोवाडा सादर करणार आहे. nअभियानासाठी प्रेरणादायी ठरलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाकडून विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. 

राज्यातून तीन लाखांवर प्रौढांची नोंदणीमोहिमेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील तीन लाख ३८ हजार ८० निरक्षर नागरिकांनी ‘उल्लास’ ॲपवर नावनोंदणीकेली आहे, त्यांना शिकविण्यासाठी तब्बल ४५ हजार ८६२ तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :delhiदिल्ली