शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची माहिती द्या...खाकी आपलीच आहे!; चौकाचौकात पोलिसांचे होर्डिंग, संपर्क क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 19:33 IST

चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे.

अविनाश साबापुरेयवतमाळ : चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे. स्लम असो की उच्चभ्रू वस्ती, उघड-उघड गुन्हे घडत आहेत. लोक डोळ्यादेखत गुन्हे पाहूनही गप्प बसतात. अशावेळी ‘पोलीस आपल्या’ रक्षणासाठी आहेत, ही भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न जिल्हा पोलीस दलाने सुरू केले आहे. त्यासाठी चौका चौकात थेट पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत. यवतमाळात टोळी युद्धाचे फटके सामान्य माणसांना बसत आहेत. कोणता माणूस कोणत्या टोळीचा सदस्य आहे, हेही सर्वसामान्यांना माहिती नाही. भरचौकात साधा गाडीचा धक्का लागला तरी चाकू दाखविण्यापर्यंत वाद होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने संवेदनशील चौकांमध्ये शिपाई उभे करून ठेवले आहेत. पण जोपर्यंत पोलिसांना सामान्य नागरिकांची मदत मिळत नाही, तोपर्यंत शहरात लपून बसलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे अशक्य आहे. 

म्हणूनच पोलीस आपले आहेत, ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पोलीस दलाने ‘आपली खाकी’ असे मोठ मोठे बॅनर तयार करून शहरात सर्वत्र लावले आहेत. एखाद्या कुटुुंबाला पूर्ण संरक्षण देणारे पोलीस, असे मार्मिक चित्र या बॅनरवर दिसते. तर सोबतच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांकही त्यावर छापण्यात आले आहे. आपल्या परिसरात कुठेही गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडत असेल, गुन्हेगारांचा वावर आढळत असेल, तर नागरिकांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौक, शाहू पहेलवान चौक, महात्मा फुले चौक, नालंदा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर आदी परिसरात ‘आपली खाकी’चे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पोलीस आणि नागरिकांत आपलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वच भागात हे फलक लावले आहेत. त्याचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्या भागातून पोलिसांपर्यंत माहिती यायला वेळ लागतो, त्या भागावर विशेष भर दिला जात आहे.एम. राज कुमारजिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस