शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

परिस्थितीमुळे शिकू न शकलेल्या शेतमजुराने शाळेला दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने त्यांनी शाळेला जमीन दान देण्याची इच्छा मुख्याध्यापक  अशोक सिंगेवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या सभेत बोलून दाखविली होती. 

विठ्ठल कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : मोलमजुरी करून त्यांनी स्वकष्टाने सात एकर शेतजमीन घेतली. त्यांपैकी दोन एकर शेतजमीन शाळेला दान देऊन त्यांनी समाजापुढे दातृत्वाचा आदर्श ठेवला.तालुक्यातील वाढोणा खु. येथील या घटनेने सर्वांनाच दातृत्वाचा परिचय झाला. गावात जिल्हा परिषद शाळा आहे. याच शाळेला  सामान्य  शेतकऱ्याने दोन एकर शेती दान देऊन समाजात अद्यापही दातृत्व कायम असल्याचे दाखवून दिले. परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने त्यांनी शाळेला जमीन दान देण्याची इच्छा मुख्याध्यापक  अशोक सिंगेवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या सभेत बोलून दाखविली होती. त्यानुसार मुख्याध्यापकांनी त्यांची भेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, बीईओ प्रवीण कांबळे व दीपिका गुल्हाने यांच्याशी घालून दिली. त्यांनी जमीन शाळेच्या नावे करून घेण्यास परवानगी मिळविली. त्यासाठी लागणारे पैसे शिक्षक वसंत मोहुर्ले, अनिल म्हस्के, प्रशांत भेदुरकर, प्रवीण मडावी, मुकेश पसावत, अश्विनी पावडे यांनी गोळा केले. शेवटी परशुरामजींचे स्वप्न पूर्ण झाले आणि ३० सप्टेंबर रोजी शेत सर्व्हे गट नं. १३३ मधील दोन एकर जमीन नोंदणी कार्यालयातून शाळेच्या नावे करून दिली. या दातृत्वाची सर्वत्र चर्चा आहे. 

चार मुलीनंतर शाळा हेच माझे पाचवे अपत्य : वाढई- दुसऱ्यांच्या शेतात सालगडी राहून आणि काबाडकष्ट करून परशराम वाढई यांनी स्वकष्टाने सात एकर जमीन घेतली. त्यांतील दोन एकर शेती शाळेला दान दिली. या कार्यात त्यांची पत्नी सावित्राबाई वाढई आणि शोभा प्रधान, बेबी लेनगुरे, दुर्गा चोधरी, माला चौधरी या चार विवाहित मुलींनी त्यांना प्रोत्साहन दिले. चार मुलींनंतरही पाचवे अपत्य ही माझी शाळा आहे, अशी भावना परशराम यांनी व्यक्त केली. या शाळेत मुले शिकतील, मोठे होतील, ते पाहून मी धन्य व तृप्त होईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यात ईकलाक खान, सरपंच वेणुताई कोटनाके, उपसरपंच उत्तम शेंडे, माजी सरपंच बळिराम ऊइके, पोलीस पाटील अण्णा भेंडाळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम खान, संतोष गुरनुले, मोतीराम मोहुुर्ले, सुनील चौधरी, रामदास पवार, गुरुदेव प्रधान यांनी पुढाकार घेतला.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSchoolशाळा