लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे आणि नागपूर-तुळजापूर महामार्गासाठी भूसंपादनाचा आढावा खासदार भावना गवळी यांनी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नागपूर-तुळजापूर महामार्ग प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पाटील आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.यवतमाळ शहरालगतच्या गोधणी येथील भूसंपादनासंदर्भात फेरअहवाल तयार करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. पुसद तालुक्याच्या वेणी येथील जमिनीसंदर्भात नव्याने स्थळ पंचनामा करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. जमीन अधिग्रहित करताना ओलित आणि कोरडवाहू असा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातही संबंधितांना भरपाईची रक्कम देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तलाठ्यांच्या चुकीमुळे पेºयाची नोंद झाली नाही. अशा शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना मोबदला देण्यात यावा, असे खासदारांनी सांगितले.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी दारव्हा ते नांदेडपर्यंतच्या निविदा काढण्याचे काम प्रस्तावित आहे. रेल्वे विभागाचे कार्यकारी अभियंता शुक्ला यांनी ही माहिती दिली. २०१९ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे, असे खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे.
भूसंपादनाचा खासदारांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:45 IST