घाटंजी( यवतमाळ)- घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथे शुक्रवारी सोलंकी व धोतरकर या गटात जुन्या वादातून हाणामारी झाली. यात दोन्ही गटाने परस्परविरोधात तक्रारी दिल्याने पारवा पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांवर विविध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. कमलाबाई धोतरकर हिच्या तक्रारीनुसार, स्वच्छतागृह मंजूर झाल्याने ती घर टॅक्स पावती मागण्यास ग्रामपंचायतीकडे जात असता आयोनोदिन सोलंकी यांनी तिला खूणावून बोलाविले व अश्लील शिवीगाळ केली. अयोद्दीन, त्यांचा भाऊ कालू व मुलगा नियाजू सोलंकी यांनी मारहाण केली. आयनोद्दीन सोलंकी यांनी कमलाबाईच्या गळ्यातील 20 मनी असलेली सोन्याची 3 ग्रॅमची आखूड पोत 10,000 रुपये किमतीची जबरीने चोरून नेली. यावरून पारवा पोलीस यांनी आयनोदिन शमशोदिन सोलंकी, कालू शमशोदिन सोलंकी व नियाजु आयनोदिन सोलंकी यांचेवर कलम 392, 294, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आयनोदिन सोलंकी गटाने दिलेल्या तक्रारीवरून त्या गटावर कलम 392, 341, 324, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना सुध्दा अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाणेदार गोरख चौधर हे करीत आहे.
कुर्ली येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांतील लोकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 18:11 IST