शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

सायखेडा येथे कुल्फी विक्रेत्याला ट्रकने चिरडले

By admin | Updated: April 1, 2015 02:05 IST

भरधाव ट्रकने दोन झाडांना धडक देवून रस्त्यावरील एका कुल्फी विक्रेत्याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला.

रुंझा : भरधाव ट्रकने दोन झाडांना धडक देवून रस्त्यावरील एका कुल्फी विक्रेत्याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी तब्बल चार तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.राजू जनार्दन ठाकरे (४०) रा.सायखेडा असे मृताचे नाव आहे. तर नारायण कोवे (३५) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी यवतमाळवरून चंद्रपूरकडे ट्रक एम.एच.४०/वाय-९०६० भरधाव वेगाने जात होता. सायखेडा गावानजीक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेले. अनियंत्रीत ट्रक दोन झाडांवर आदळून सायखेडा येथील एका आॅटोमोबाईलच्या दुकानाला जावून धडकला. दरम्यान, रस्त्यावर असलेला कुल्फी विक्रेता राजू ठाकरे ट्रकखाली चिरडला गेला. तर नारायण गंभीर जखमी झाला. जखमीला उमरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, भरधाव वाहनामुळे नेहमीच अपघात होत असल्याने नागरिक संतप्त होतेच. त्यात आज गावातील इसमाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या संतापात भर पडली. शेकडो नागरिकांनी दुपारी ३ वाजतापासून यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर चक्काजाम सुरू केला. यामुळे या मार्गावरून जाणारी शेकडो वाहने ठप्प झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काजाम करणाऱ्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राळेगाव व यवतमाळवरून दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, प्रभारी पोलीस निरीक्षक राखी गेडाम घटनास्थळी आले. तब्बल चार तासानंतर नागरिकांनी चक्काजाम मागे घेतला आणि वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)