शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस, टँकर अपघातात कीर्तनकार ठार, ४६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ जावळे बाहेर ओढले जाऊन एसटी व टँकरच्या मधात फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एसटी चालक मोहम्मद अशपाक मो. अजीज (रा.नेर) यांचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले.

ठळक मुद्देनेर-कारंजा रोडवरील घटना : जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : एसटी बस व आॅईल टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर ४६ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास नेर-कारंजा मार्गावरील आजंती(खाकी) गावाजवळ घडली. रामभाऊ जावळे (७५) रा.मोरगाव जि.अकोला असे मृताचे नाव आहे. ते कीर्तनकार होते. जखमींमध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातातील १५ रुग्ण १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले.वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ जावळे बाहेर ओढले जाऊन एसटी व टँकरच्या मधात फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एसटी चालक मोहम्मद अशपाक मो. अजीज (रा.नेर) यांचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले.जखमींमध्ये सात ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी ब्राह्मणवाडा(पश्चिम), मोझर, सावरगाव(काळे), पांढरी, आजंती आदी गावातील आहे. तसेच जखमी प्रवासी वाढोणा-नेर मार्गावर असलेल्या गावातील आहेत. यातील २० जणांची प्रकृती गंभीर असून २६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.नेर-कारंजा रस्त्याचे अलीकडेच डांबरीकरण झाले आहे. रस्त्याच्या बाजू मात्र मुरुमाने भरल्या नाही. असमतल झालेल्या या रस्त्यावर बस वळविताना खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.अपघातातील जखमींना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे, शंकर भागडकर, नाना घोगडे, पल्लवी गाडगीळवार, दीपक मिसळे, अनिल मोगरे यांनी जखमींवर उपचार केले.खरडगावचे कीर्तन ठरले अखेरचेहभप रामभाऊ जावळे हे बुधवारी रात्री खरडगाव येथे भागवत सप्ताहात कीर्तनासाठी आले होते. रात्री मुक्कामानंतर सकाळी मूळ गाव मोरगाव येथे जाण्यासाठी बसने निघाले. चालकाच्या मागेच बसले असल्याने दोन वाहनाच्या मधात फसले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खरडगावचे कीर्तन त्यांचे अखेरचे ठरले. रामभाऊ जावळे हे अविवाहित होते. त्यांच्या मागे दत्तक घेतलेली मुलगी सुवर्णा भगवान काळे (रा.आळंदी) ही आहे.

टॅग्स :Accidentअपघात