शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उर्दू शाळेच्या मुलांना मराठी पुस्तकांची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 9:33 PM

पुण्या-मुंबईचे लोक मराठीची अवहेलना होत असल्याबद्दल गळे काढत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात मनोभावे मराठीची उपासना केली जात आहे. चक्क उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुस्लीम समूदायातील बच्चे कंपनीलाही मराठीची गोडी लागली आहे. त्यातूनच एका शिक्षकाने उर्दू शाळेत मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय निर्माण केले आहे.

ठळक मुद्देसाकारले मराठी वाचनालय : दारव्हा तालुक्यातील शिक्षकाचा उपक्रमजागतिक पुस्तक दिन विशेष

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुण्या-मुंबईचे लोक मराठीची अवहेलना होत असल्याबद्दल गळे काढत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात मनोभावे मराठीची उपासना केली जात आहे. चक्क उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुस्लीम समूदायातील बच्चे कंपनीलाही मराठीची गोडी लागली आहे. त्यातूनच एका शिक्षकाने उर्दू शाळेत मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय निर्माण केले आहे.जागतिक पुस्तक दिनानिमित्त एका उर्दू शाळेतील मराठी वाचनालयाची ही कहाणी. दारव्हा तालुक्यातील दुधगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तेथील सर्जनशील शिक्षक अजमत खान यांनी उर्दू माध्यमातून शिकवितानाच विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जोडून ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ८०० मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केले आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम बालवाचनालय असे नाव देण्यात आले. व्यवस्थापन समितीची मदत झाली. वाचनालये अनेक शाळांमध्ये निर्माण होतात. मात्र तेथील पुस्तके केवळ रेकॉर्डपुरती आणि कपाट बंद असतात. मात्र दुधगावच्या उर्दू शाळेतील मराठी पुस्तके मुले दररोज वाचतात. कुणाचा विश्वास बसणार नाही, मात्र वर्षभरात एका-एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याने तब्बल २५-२५ पुस्तके वाचून पूर्ण केली आहे. केवळ वाचलीच नव्हे तर शिक्षक अजमत खान यांच्या मार्गदर्शनात आस्वादही घेतला आहे. या पुस्तक वाचनावर वाचनालयात नित्य चर्चा घडविली जाते. गडचिरोलीपासून सांगलीपर्यंतच्या शिक्षकांनी हे वाचनालय पाहण्यासाठी दुधगावला भेट दिली.विद्यार्थीस्नेही रचनाशाळेत केवळ नोंदीपुरती पुस्तके आणण्याचे प्रकार अनेक शाळा करतात. दुधगावच्या शाळेने मात्र वाचनालयासाठी खास कक्ष निर्माण केला. पुस्तके विशिष्ट आकारात भिंतीवर लटकविण्यात आली. या रचनेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ सहज दिसते आणि कोणत्याही पुस्तकाला हात लावून ते वाचू शकतात. दिल्लीतील शाळेमधील ‘रुम फॉर रिडींग’ बघितल्यानंतर ही रचना केल्याचे खान यांनी सांगितले.आम्ही उर्दू माध्यमात शिकल्यामुळे पुढे एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ मराठीच्या भीतीपायी उतरु शकलो नाही. ग्रामीण भागातील उर्दू माध्यमातील आमच्या विद्यार्थ्यांचीही अशी अवस्था होऊ नये म्हणून हा उपक्रम सुरू केला. प्राथमिकपासूनच त्यांना मराठी वाचनाची संधी देत आहो. शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लोकवर्गणीतून यश आले.- अजमत खान, शिक्षक, जिल्हा परिषद उर्दू शाळा, दुधगाव