खारूताईला मेजवानी... पिवळ्या जर्द फुलांनी बहरलेले हे भोकराचे झाड. काहीशी चिकट परंतु अतिशय चवदार असलेली ही फळे अनेकांना आवडतात. या खारूताईला देखील या फळांचा मोह आवरला नाही. मग, थेट झाडावर चढून भोकराच्या फळांवर तिने असा यथेच्छ ताव मारला. हाताच्या इवल्याशा पंज्यात भोकर धरून दाताने कुरतडताना ही खारूताई किती गोड दिसतेय नाही?
खारूताईला मेजवानी...
By admin | Updated: May 27, 2016 00:28 IST