शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुडेचे खोरे झाले ‘कचराघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:13 IST

मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते.

ठळक मुद्देनागरिकांची अनास्था : नदीपात्रात कचऱ्याचे ढिगारे, निर्माल्याचेही नदीतच विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते. नदीच्या या प्रदूषणाला नागरिकांची बेपर्वा वृत्ती आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्याकडून होत आहे.यावर्षी या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. मध्यंतरी आलेल्या मुसळधार पावसाने निर्गुडा नदीला अनेकदा पूर आला. गेल्या अनेक महिन्यात नदी पात्रात टाकण्यात आलेला केरकचरा पुरात वाहून आला. त्याचे आता नदीच्या पात्रात मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर प्लॉस्टीक पन्न्यांचा समावेश आहे. पर्यावरणाला घातक असलेले शेकडो टन प्लॉस्टीक नदीच्या पात्रात पडून आहे. यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीचे किनारे दुतर्फा घाणीने बरबटलेले आहे. नागरिक घरातील कचरा, निर्माल्याचे साहित्य नित्यनेमाने या नदीत आणून टाकत असल्याचे चित्र दररोजच पहायला मिळते. यामुळे नदी प्रदूषित होत असल्याची जाणिव त्यांना कोण करून देणार, हा प्रश्न पर्यावरणवाद्यांना छळत आहे. उघड्यावर शौैचास बसणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिकेचे गुडमॉर्निंग पथक कार्यरत आहे. मात्र आठवड्यातून एखाद्याच दिवशी या भागात पथकातील सदस्य गस्त घालताना दिसतात. अन्य दिवशी नदीच्या काठावर प्रात:र्विधी करणाऱ्यांची मोेठी गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे पालिकेचे पथक नदीच्या एकाच बाजुने कारवाई करताना दिसतात. दुसरी बाजू गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, आणि गणेशपूर ग्रामपंचायतीने अद्याप स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने किंवा उघड्यावर शौैचास करणाºयांवर कोणतीही बंदी घातली नसल्याने निगुर्डा नदीचे किनारे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. काही ठिकाणी नदी पात्रात मांस विक्रीसाठी जनावरांची कत्तल केली जात आहे. निरूपयोगी मांस नदीपात्रातच टाकले जात आहेत.निर्देशांकडे दुर्लक्षनदी प्रदूषित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी अन्य जिल्ह्यात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच चौैघांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. मात्र या निर्देशाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत चालले आहे.स्वच्छतेसाठी पुढाकार हवाकाही वर्षांपूर्वी वणीत निगुर्डा नदीचे खोलिकरण व स्वच्छतेसाठी स्थानिक राजकीय, सामाजिक संघटनांच्या पुढाकारात ‘मिशन निर्गुडा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर नदीच्या स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी जागृक रहावे, नदी पात्रात कोणताही कचरा टाकला जाऊ नये, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :riverनदी