शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:58 IST

उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याची सोय : अग्नी प्रतिबंधक उपकरण, बॉडी कंडिशनकडे लक्ष देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने राज्यातील सर्व विभागातून जादा वाहतूक केली जाणार आहे. यासाठी फेऱ्या वाढणार असल्याने पुरेशा बसेस उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहे. जादा वाहतुकीच्या कालावधीत सुस्थितीच्या बसेस जातील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.सर्व बसेस आतून-बाहेरून स्वच्छ धुतलेल्या असाव्या, गाड्यांच्या सर्व सीट उत्तम स्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, खिडक्या व्यवस्थित असल्याची खबरदारी घ्यावी, स्पेअर टायर व व्हेईकल टुल द्यावा, टायर सुस्थितीत असावे, गाडी सेल्फ स्टार्ट असावी, वायफर व लाईट चालू असल्याची खात्री करावी, अग्नी प्रतिबंधक उपकरण आणि प्रथमोपचार पेटी आवश्यक त्या औषधांसहीत असल्याची खात्री करावी, गाड्यांची बॉडी कंडिशन तसेच यांत्रिक स्थिती उत्तम असावी आणि विशेष म्हणजे गाडीचा आतील व बाहेरील रंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना विभाग नियंत्रक आदींना देण्यात आल्या आहेत.रंग उडून गेलेली आणि रंग पुसट झालेली तसेच खराब झालेली वाहने कुठल्याही स्थितीत मार्गावर देण्यात येऊ नये. मार्गावर जाणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाड होणार नाही तसेच यांत्रिक दोषामुळे कोणताही अपघात होणार नाही यादृष्टीने योग्य ती दक्षता घेण्यात यावी, प्रवासी सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्या, असे सूचविण्यात आले आहे. मात्र अनेक आगारांमध्ये बसचा तुटवडा आहे. कामगारांची वाणवा आहे. या सोयी सक्षम असल्याशिवाय सूचविलेल्या उपाययोजना प्रत्यक्ष अंमलात आणणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे या बाबीकडेही महामंडळाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :state transportएसटी