शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाटणबोरीत शस्त्राच्या धाकावर अडीच लाखांचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2022 00:01 IST

दाराचा आवाज आल्याने मनोहर खुपाट यांनी उठून बघितले असता, त्यांच्या बेडरूममध्ये दोघेजण उभे होते. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांपैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती.  मनोहर खुपाट यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने चाकू दाखवून ‘सोना कहा पर है जल्दी बताओ, अगर चिल्लाओगे तो चाकू मार दुंगा’ असे धमकावले.

लोकमत न्यूज नेटवर्क पाटणबोरी : मंगळवारी मध्यरात्री येथील सरस्वतीनगरमधील सेवानिवृत्त वनपालाच्या घरात शिरून दोघांनी चाकू व कुऱ्हाडीच्या धाकावर घरातील आलमारीत असलेला दोन लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी शहरात चोरीच्या लागोपाठ घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पाटणबोरीतील महाकाली मंदिराजवळील सरस्वतीनगरमध्ये सेवानिवृत्त वनपाल मनोहर पैकुजी खुपाट हे वास्तव्याला आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे स्वयंपाक खोलीतून त्यांच्या घरात शिरले. यावेळी मनोहर खुफाट हे बेडरूमध्ये, तर त्यांची पत्नी, मुलगा व सून हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, दाराचा आवाज आल्याने मनोहर खुपाट यांनी उठून बघितले असता, त्यांच्या बेडरूममध्ये दोघेजण उभे होते. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांपैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती.  मनोहर खुपाट यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने चाकू दाखवून ‘सोना कहा पर है जल्दी बताओ, अगर चिल्लाओगे तो चाकू मार दुंगा’ असे धमकावले. दुसऱ्याने लगेच बेडरूममधील आलमारीची दोन्ही दारे उघडून सोन्याची काळी पोत (२५ ग्रॅम, अंदाजे किंमत एक लाख), सोन्याचा गोफ (चार ग्रॅम १६ हजार रुपये), सोन्याच्या तीन अंगठ्या (१२ ग्रॅम, ४८ हजार रुपये),  कर्णफुले (४ ग्रॅम, १६ हजार रुपये), लहान बाळाच्या अंगठ्या (पाच ग्रॅम, वीस हजार रुपये), सोन्याच्या रिंगा (४ ग्रॅम, १६ हजार रुपये), चांदीच्या तोरड्या (३ हजार ६००) व रोख ४० हजार रुपये, असा एकूण दोन लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पिशवीमध्ये भरून बेडरूमच्या मागील दाराने पळून गेले. हे चोरटे महाकाली मंदिराच्या दिशेने पळून गेले.  रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ठाणेदार जगदीश मंडलवार तथा सपोनी हेमराज कोळी यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळावर दाखल झाली. मात्र, पोलिसांच्या हाती सध्या तरी विशेष काही लागलेले नाही. दोन दिवसांतील चोरीची तिसरी घटना असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे पोलिसांनी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सपोनी हेमराज कोळी करीत आहेत. 

नागरिकांनी केला चोरट्यांचा पाठलागघटनेनंतर हे चोरटे पळून जात असताना पाटणबोरीतील शेख चॉंद पाशा, साहिल बावणे व अनिकेत बावणे यांना दिसले. संशय आल्याने या तिघांनी चोरट्यांवर दगडफेक केली. या धावपळीत चोरट्यांनी चाकू तेथेच टाकला व ते पाटण मार्गाने पळून गेले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते हाती लागले नाही. गेल्या चार दिवसात पाटणबोरीत लागोपाठ चोरीच्या घटना घडत असून अद्याप या चोरट्यांचा शोध घेण्यास पांढरकवडा पोलिसांना यश आले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी