शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

उभ्या पिकांत चालविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM

प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. वन हक्क कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, अशांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र वन हक्क कायद्याच्या चाकोरीमध्ये न बसण्याची अनेक कारणे व अडचणी आहेत. गरिबी व अज्ञानामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : वन विभागाच्या अतिक्रमण हटावविरुद्ध शिवार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : वन विभागाने अतिक्रमित शेतात पेरणी झालेल्या पिकांची जेसीबी मशिनद्वारे नासाडी करून सक्तीने व निर्दयपणे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु केली. त्यामुळे सरकारी जमीनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत पसरली. या मोहिमेचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील कोंडजळी येथे शेतकरी उमेश मांडवकर यांच्या शेतात प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाने शनिवारी शिवार आंदोलन केले.प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. वन हक्क कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, अशांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र वन हक्क कायद्याच्या चाकोरीमध्ये न बसण्याची अनेक कारणे व अडचणी आहेत. गरिबी व अज्ञानामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटाची भाकर हिसकावून संसार उघड्यावर पाडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. आदिवासी, ईतर मागास व भटक्या जमाती भीक्षा मागणे, शिकार करणे आता शक्य नसल्याने वन जमिनीवर शेती करीत आहे. पडित जमिनीवर अतिक्रमण करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यांचे जीवन उाड्यावर आणणाऱ्या या कारवाईचा निषेध केला.घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार राठोड यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन पाठविले. निवेदनातून गरीब अतिक्रमणधारकांच्या शेत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही थांबवावी, अशी मागणी केली. या आंदोलनात हरिभाऊ पेंदोर, प्रशांत धांदे, अशोक जयस्वाल, दिनकर मानकर, सय्यद आसिफ यांच्यासह साखरा, मानोली, आमडी, बेलोरा, घाटी, खापरी येथील नागोराव कनाके, अंबादास वानखडे, लक्ष्मण घुम्मडवार, संभू वाढई, उत्तम धोटे, गजानन कोटरंगे, हनुमान चाफले, देवु राठोड, अयुब पठाण, रामदास कुंभारे, उमेश मांडवकर सहभागी होते.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन जमिनीवर अतिक्रमण करून काहींनी शेती केली आहे. मागासवर्गीय व भटक्या प्रवर्गातील अनेकांनी त्यावरच आपली उपजीविका सुरू केली आहे. अनेकांचे परंपरागत व्यवसाय बंद झाल्याने नाईलाजाने त्यांनी ही पडीत जमीन कसण्यास सुरुवात केली. या जमिनीचा शासनाला कोणताही लाभ नाही. आता त्याच जमिनीवरील उभी पिके नष्ट करून अतिक्रमण हटविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जमीन कसणाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी