शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जवाहरलाल दर्डा २१ वा स्मृती समारोह : संगीत-साहित्याची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 13:41 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले राहुल देशपांडे यांची मैफल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले ख्यातकीर्त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मैफल शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आयोजित करण्यात आली आहे.बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त मागील वर्षी यवतमाळच्या रसिकांना ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यांतून लोकप्रिय झालेल्या महेश काळे यांचे गायन अनुभवता आले. यंदा याच चित्रपटासाठी स्वर देणारे दुसरे महत्त्वाचे गायक राहुल देशपांडे यांची स्वरांजली होत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या खाँ साहेब आफताब हुसेन बरेलीवाले या मध्यवर्ती पात्रासाठी राहुल देशपांडे यांनी पार्श्वगायन केले. विशेष म्हणजे, चित्रपटापूर्वी ‘कट्यार काळजात घुसली’ हे कथानक नाट्यरूपात रंगमंचावर सादर झाले. त्यावेळी खाँ साहेबांची भूमिका स्वत: राहुल देशपांडे यांनीच दमदारपणे साकार केली होती. आता तेच स्वर साक्षात यवतमाळकरांना ऐकता येणार आहे.राहुल देशपांडे दरवर्षी आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वसंतोत्सव’ आयोजित करून रसिकांना अस्सल गायकीची मेजवाणी देतात. ‘संगीत मानापमान’ या प्रसिद्ध संगीत नाटकाची राहुल देशपांडे यांनी नव्या स्वरूपातील आवृत्ती साकारली असून पूर्वीच्या ५२ ऐवजी २२ शास्त्रीय गीतांचा समावेश केला आहे. शिवाय ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातूनही त्यांनी शास्त्रीय गायनाचा नजराणा रसिकांना दिला आहे. शिवाय ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा चित्रपटांसाठी त्यांचे पार्श्वगायन लोकप्रिय झाले. तर आगामी ‘अ मंथ अ‍ॅन्ड अ विक’ या चित्रपटासाठीही पार्श्वगायक आणि अभिनेता म्हणूनही राहुल देशपांडे यांनी काम केले आहे.शास्त्रीय गायनासोबत नाट्यगीत, ख्याल, दादरा, ठुमरी, भजन, गझल आणि भावगीताच्या प्रांतातही राहुल देशपांडे यांनी रसिकांची दाद मिळविली आहे. अशा या बहुआयामी गायकाची मैफल ऐकण्याची संधी यवतमाळकरांना उपलब्ध झाली आहे.

  • २४ नोव्हेंबर, सायंकाळी ६.३० वाजता, प्रेरणास्थळ

राहुल देशपांडे यांचे गायन

  • २५ नोव्हेंबर, सकाळी ९ वाजता, प्रेरणास्थळ

संगीतमय प्रार्थना सभा

  • २५ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता, दर्डा मातोश्री सभागृह

प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांचे व्याख्यान तसेच भारत दौंडकर व अनिल दीक्षित यांच्या कवितांची जुगलबंदी

  • २५ नोव्हेंबर, दुपारी १२ वाजता, हनुमान आखाडा

इनामी काटा कुस्त्यांची दंगल

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा