लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. क्षणात प्रवाशांनी त्या प्रवाशाकडे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी लगबग सुरू केली आणि धावत्या बसमध्येच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार सुरू झाला.ना. राठोड हे शुक्रवारी दुपारी आपल्या शासकीय वाहनाने यवतमाळहून मतदारसंघात दारव्हा येथे जाण्यासाठी निघाले. बोरीअरबच्या थोडे पुढे गेल्यानंतर त्यांचे शासकीय वाहन शेलोडीनजीक पंचर झाले. टायर बदलविण्यासाठी वेळ लागणार असल्याने ना. राठोड यांनी पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय घेतला. यवतमाळहून पुसदकडे जाणारी बस ना. राठोड यांनी हात दाखवून थांबविली आणि ते बसमध्ये चढले. ना. संजय राठोड यांनी त्यांच्यासह इतर दोघांच्या, अशा तीन तिकीट घेतल्या. गर्दीमुळे जागा नव्हती. पंरतु, अनेकांनी आग्रह धरल्याने ते वाहकाच्या जागेवर बसले. तेव्हा प्रवाशांनी लागलीच आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडण्यास सुरूवात केली.दारव्हा येथे उतरल्यानंतर बसस्थानकाचा फेरफटका मारून ना. राठोड यांनी आगार प्रमुखांशी चर्चा केली. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, बसस्थानकावरील स्वच्छता याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
महसूल राज्यमंत्र्यांचा धावत्या ‘एसटी’ बसमध्ये जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:43 IST
यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली.
महसूल राज्यमंत्र्यांचा धावत्या ‘एसटी’ बसमध्ये जनता दरबार
ठळक मुद्देप्रवासी अवाक् : गर्दी असल्याने उभ्याने प्रवास