शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:09 IST

शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत.

ठळक मुद्देसफाई कामगारांचा समाजाला सवाल : शासकीय योजनांचा लाभ घरापर्यंत पोहोचतच नाही

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही तुच्छतेचाच आहे. आम्ही जी स्वच्छता करतो त्यामुळेच समाज निरोगी आणि सुदृढ राहण्यास मोलाचा हातभार लागतो. मात्र यानंतरही समाजात श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. स्वच्छतेची कामे करणे गैर आहे का? असा सवाल यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षक लता प्रताप गोंधळे यांनी समाजाला विचारला आहे.शनिवारच्या श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक लता गोंधळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.समाजाचा सफाई कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिवसभर स्वच्छता करायची आणि घरी आल्यावर पुन्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच काम महिला सफाई कामगार अविरत पार पडतात. हे कार्य अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. सेवानगर हा सफाई कामगारांचा परिसर म्हणूनच ओळखला जातो. हा परिसर कामगार मेहनत करून स्वच्छ ठेवतात. मात्र शासकीय योजनांचा लाभ अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. या परिसरात २००१ मध्ये बांधलेले समाज भवन अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला हक्काची जागाच उपलब्ध होत नाही.लताताई या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांचे वडील सफाई कामगार होते. त्या सासरी आल्यानंतर सफाई कामगार म्हणून नगरपरिषदेत लागल्या. तब्बल १२ वर्षे त्यांनी सफाई कामगार म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शौचालयाची सफाई करणे, नाल्या साफ करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे असे काम केली. त्यानंतर त्यांची पर्यवेक्षक म्हणून निवड झाली. आता त्या प्रभारी आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत आहे. आजही त्या सफाईचे काम करतात. त्यांच्या हाताखाली ९० महिला स्वच्छतेचे काम करीत आहे. समाजात आजही स्वच्छतेची जागरुकता नाही. सार्वजनिक शौचालयात कितीही स्वच्छता केली तरी घाण हाते. त्याचे खापर सफाई कामगारांवर फोडले जाते.श्रमिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण आजही तुच्छतेचाच : खंतलता गोंधळे यांच्या २७ वर्षाच्या सेवेत त्यांनी समाजातील तुच्छतेचा भाव जवळून पाहिला. त्या म्हणाल्या, पूर्वी आमच्या हातचे पाणी कोणी पित नव्हते, सार्वजनिक कार्यक्रमातही निमंत्रण राहत नव्हते. काळानुसार हा प्रकार ८० टक्के कमी झाला. मात्र तरीही आजही स्वच्छतेच्या कामावर जाणाऱ्या महिलांकडे समाज तुच्छतेने पाहतो, अशी खंत व्यक्त करताना ही स्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्वांकडे समानतेच्या नजरेने पाहिले तरच समाजाचा विकास शक्य होणार आहे. शिक्षित पिढी आजही साफसफाईचे काम करते, याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ