शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे आरक्षित पाणी आले वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:19 IST

टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडे १९ कोटी थकीत : टंचाईग्रस्त भागाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या टंचाईग्रस्त गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेमार्फत पाणी आरक्षित केले जाते. यापूर्वी जिल्हा परिषदेने या प्रकल्पाचे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतले. परंतु इसापूर धरण प्रकल्प विभागाला रक्कम दिली नाही. कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत झाल्याने या प्रकल्प विभागाने पाणी देणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे.जून २०१८ अखेर यवतमाळ जिल्हा परिषदेकडे १८ कोटी ५९ लाखाहून अधिक रक्कम थकीत आहे. शिवाय २०१८-१९ अर्थात यावर्षीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३० टक्के पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ३० टक्के आरक्षित पाण्याची ५० टक्के रक्कम ५४ लाख रुपये होते. ही संपूर्ण रक्कम १९ कोटींपेक्षा अधिक होते. या पूर्ण रकमेचा भरणा जिल्हा परिषदेने केला तरच पाणी दिले जाईल, असे नांदेड येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.पुसद, उमरखेडपुढे गंभीर प्रश्नजिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० टक्के पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांना पुरविले जाते. मात्र आता उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाने पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेकडे दरवर्षी या प्रकल्पाच्या पाण्याची थकीत रक्कम वाढत आहे. वारंवार सुचना, पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळेच प्रकल्प विभागाने पाणी न सोडण्याची टोकाची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते. आता यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे उमरखेड आणि पुसद तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई