शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना; बेभरवशाची शेती का करायची शेतकऱ्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:48 IST

दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच : भावबंदीचा खेळ थांबणार तरी कधी?

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शेती करून कर्जबाजारी झालो. आज ना उद्या फायद्यात येईन म्हणून शेती करून राबलो. पण, शेतमालाला भावच नाही. नोटबंदीसारखी सरकारने भावबंदी केली. कापूस असो की, सोयाबीन भाव वाढत नाही आणि कास्तकार मोठा होत नाही. बेभरवशाची शेती का करायची साहेब, तुम्हीच सांगा? अशी विचारणा करत शेतकरी डोळ्याच्या कडा पुसतो. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भावबंदीचा खेळ कधी थांबेल? असा धीरगंभीर सवाल वणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

वणी तालुक्यात सोयाबीन, कापूस आणि तूर हे शेतकऱ्यांचे हुकमी पीक जे येथील शेताशेतात दिसते. या पिकांच्या ताकदीवर कास्तकार कुटुंबाचा गाडा चालवतो. पीक काढून काढून काळी माऊलीही थकली आहे. खताचा मारा वाढला. अतिवृष्टी, रोगराईने पीक नेस्तनाबूत झाले. घरातील किडूकमिडूक विकून शेतीला लावलेला पैसाही गेला. पण शेतकऱ्याच्या पिकाला काही भाव मिळेना. कापूस, सोयाबीनला खुल्या बाजारात भाव नाही. 

गेल्या दहा वर्षांत सरकारने अत्यल्प भाववाढ केली. व्यापारी, दलाल शेतकऱ्यांना भाव मिळू देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. यावर्षी सोयाबीन हाती काही पडू देईल, याची शाश्वती नाही. यलो मोॉक रोगामुळे व जास्त पाऊस झाल्याने काही भागात संपूर्ण सोयाबीन पीक गेले. शेतीला लावलेला खर्चही निघू शकत नाही. यलो मोॉकमुळे सोयाबीन पिवळे पळून वाळत आहेत. शेंगातील दाणेसुद्धा बरोबर भरलेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. कुटुंबाचे कसे होईल? या चिंतेने झोपच उडाल्याचे शेतकरी सांगतात. 

कैद सरकारने हमीभाव जाहीर करताना खर्चावरील लाभ ५० टक्के असल्याचा दावा केला. त्यात शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान १.५  पद पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात कापसावर होणारा एकूण खर्च काढला, तर ही शेती उत्पादकांना आतबट्ट्याची ठरत आहे. 

कापूस पीक घेण्यासाठी एकरी सरासरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. एकरी सरासरी चार क्विंटल कापसाचे उत्पादन मिळते. प्रतिक्विंटल सहा हजार ९०० रुपये दराने २७ ते २८ हजार रुपयेच शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. 

"एक क्चिटल सोयाबीनचा खर्च सहा हजार रुपये आहे. त्याला जर दीडपट हमीभाव मिळाला तर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायला हवा. तरच शेतकऱ्यांना शेती करणे परवडेल. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कपाशीच्या हमीभावात वाढ करणे आवश्यक आहे." - देवराव धांडे, शेतकरी नेते

सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल२०१७                 ३०५० २०१८                  ३३९९ २०१९                  ३७१० २०२०                  ३८८० २०२१                  ३९५० २०२२                  ४३०० २०२३                  ४६०० २०२४                  ४८९२ 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ