शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:48 IST

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता.

नवी मुंबई : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप तसेच दोन वाहने असा ३९ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरातून आयपीएल टी २० च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १ ला मिळाली होती. त्याकरिता मुंबई-पुणे परिसरातील सट्टेबाज एकत्र आल्याचीही खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष १चे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे, वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे, सहायक निरीक्षक नितीन थोरात, नीलेश माने यांचे पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान वाशीतील फोर पॉइंट हॉटेलमध्ये भाड्याच्या खोलीत संशयित तरुण राहत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. यानुसार त्यांनी १२ मे रोजी रात्री १० वाजता १९१८ क्रमांकाच्या खोलीवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी सहा तरुण सट्टा लावण्यासाठी जमल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून खोलीची झडती घेतली असता, ३ लॅपटॉप, २७ मोबाइल, २७ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, व्हाइस रेकॉर्डर आढळून आले. यानुसार त्यांनी वापरलेली दोन वाहने व सट्टा लावण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण ३९ लाख २९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.राकेश अरुण कोंडरे (३०), अभिजित मल्हारी कोळेकर (३३), कृष्णा गणपत सगट (३२), धर्मेश प्रवीण गाला (३५), गणेश संभाजी माने (३४) व किशोर जगदीश रिहाल (३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी दिल्ली डेअर डेविल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू या सामन्यावर आॅनलाइन सट्टा लावला होता. हे सर्व जण पुणे, मुंबईसह नवी मुंबईचे राहणारे आहेत. त्यांना १७ मेपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018