शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नेर शिवसेनेतील नाराजांकडून पक्षातील पर्यायांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:10 IST

महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच्या गटाची वाट धरली आहे.

ठळक मुद्देपक्षांतर्गत कलह : लोकप्रतिनिधीही संपर्कात, दोन प्रमुख गटातील वाद

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच्या गटाची वाट धरली आहे. कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकारीही याच वाटेवर आहे. विशेष म्हणजे कट्टर समर्थकांनी संजय राठोड यांना यापूर्वीच सावधही केले होते. त्यांनी हा विषय सहज घेतला होता.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नेरमध्ये शिवसेनेने आपली पकड मजबूत केली. हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अर्थातच यात ना. संजय राठोड यांची मेहनत आहे. परंतु अलिकडे काही वर्षात गट तयार होत गेले. याला ब्रेक लावला गेला नाही. शिवसैनिकांपुढे नेता म्हणून तालुक्यात दुसरा चेहरा नव्हता. ना. संजय राठोड यांच्याशिवाय पर्याय नसल्याने कार्यकर्ते डिकून होते.ना. संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यात पडलेली मतभेदाची ठिणगी नाराज कार्यकर्त्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. संजय राठोड यांचे विरोधक मानले जाणारे कार्यकर्ते भावना गवळी यांच्या तंबूत दिसत आहे. वास्तविक भावना गवळी यांचे लोकसभेतील मताधिक्य वाढविण्यात संजय राठोड यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. मागील काही महिन्यांपासून नेर तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भावना गवळी यांची हजेरी नगण्य आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या फलकावरूनही त्या बाहेर गेल्या आहे. या दोन नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी नाराजांसाठी संधी ठरत आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडBhavna Gavliभावना गवळी