शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

आंतरपिकातून युवकाला गवसली समृध्दीची दिशा

By admin | Updated: December 14, 2015 02:33 IST

युवावर्ग आज शेतीपासून दूर चालला आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जातात. ही कारणे बऱ्याचअंशी साधारही आहे.

खूणगाठ : कळंबमध्ये झाले तूर बियाणे विकसित, चिकाटी आणि परिश्रमाची जोडगजानन अक्कलवार कळंबयुवावर्ग आज शेतीपासून दूर चालला आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जातात. ही कारणे बऱ्याचअंशी साधारही आहे. पण काहींनी यावरही मात करत साधलेली प्रगती इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. यातीलच एक म्हणजे, कळंब येथील दीपक रामदास गोरे होय. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कल्पकतेतून त्याने कृषी क्षेत्रात घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. दीपक गोरे या ३२ वर्षीय युवकाचे शिक्षण एम.कॉमपर्यंत झाले. नोकरीच्या मागे न धावता त्याने शेतीचा व्यवसाय करण्याची खुनगाठ मनाशी बांधली. बहुतेक शेतकरी कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकाची लागवड करतात. परंतु दीपकने यावर्षी आपल्या दहा एकर शेतात केवळ तुरीची लागवड केली. विशेष म्हणजे तुरीचे बियाणे विकत न आणता घरचेच वापरले. एक बाय नऊ फुटावर लावण्यात आलेल्या तुरीमध्ये आंतरपीक म्हणून मधुमक्काचे पीक घतले. यातुन त्याला ६० हजार रुपयाचे उत्पन्न झाले. आता तुर कापणीच्या मार्गावर आहे. तत्पूर्वी त्याने एकदा तुरीची छाटणी केली. त्यामुळे तुरीचे झाड बहरले. आता तूर इतकी लदबदून गेली आहे की, ती चक्क जमिनीला टेकली. एकरी १० क्विंटलवर तूर होण्याचा अंदाज त्याला आहे. एवढे उत्पादन झाल्यास त्याला आजच्या बाजारभावानुसार जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तूर पिकासाठी त्याने कुठल्याही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. केवळ दोनदा फवारणी केली. असे असताना किडीचा कुठलाही प्रादुर्भाव नसल्याचा दावा दीपकने केला आहे. त्याने यापूर्वी शेतीत विविध प्रयोग केले. त्यातून फायदाही मिळाला. त्यामुळे त्याने यावर्षी केवळ तूर या पीकाची सलग लागवड केली. कपाशी व सोयाबीनपेक्षाही कमी खर्चाचे तूर पीक आहे. मजुरीचा खर्चही कमी लागतो. त्यामुळे त्याने या पिकाला प्राधान्य दिले. दीपकने तुरीचे वाण विकसित केले आहे. त्याच्या शेतातील तुरीच्या शेंगा लालसर तांबड्या आहे. पाच ते सात दाण्याची ही शेंग आहे. दानाही टपोरा आहे. काही गुंठे जागेवर ही तूर लावण्यात आली आहे. पुढील हंगामातही हीच तूर बियाणे म्हणून वापरणार असल्याचे त्याने सांगितले.