शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:47 IST

तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.

ठळक मुद्देट्रॅक्टर जप्तीने भंडाफोड : लिलाव प्रक्रियेला बगल, आधी दंड मग दुप्पट दर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.यवतमाळच्या तहसीलदारांनी नुकताच आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीचा खुल्या जागेतील सर्व साठा जप्त केला. हा साठा ४०० ते ५०० ब्रास असल्याचे सांगितले जाते. बाजारात रेतीला प्रती ब्रास पाच ते सात हजार रुपये दर आकारला जातो. या बहुतांश बेवारस रेती साठ्याचा रितसर प्रक्रिया राबवून लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र त्या प्रक्रियेत न जाता महसूल विभागाने ते साठे कुणाच्या तरी मालकीचे दाखवून त्यांना प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड ठोठावला. नंतर हीच रेती संबंधितांकडून पाच ते सात हजार रुपये प्रति ब्रास व १४ हजार रुपये ट्रक (दोन ब्रास) असा दर आकारुन सर्रास बांधकामांना विकली जात आहे. दरम्यान एका नायब तहसीलदाराने अवैध रेती विरोधात मोहीम उघडली. या मोहिमेत अनेक ट्रॅक्टर जप्त झाले. मात्र त्यातील रेतीला आधीच प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड ठोठावला गेला असताना पुन्हा जप्ती कशासाठी असा प्रश्न संबंधितांनी विचारला असता रेती साठ्याचा लिलाव न करता परस्पर विक्रीचे हे प्रकरण पुढे आले. जप्तीतील ट्रॅक्टर आजही तहसील कार्यालयात उभे आहेत. विशेष असे आधी जप्त रेती साठ्याची मालकी निष्पन्न झाली असेल तर त्यांनी ती रेती कोठून आणली, रॉयल्टी भरली काय याची शहानिशा केली गेली नसल्याचे सांगितले जाते.तलाठी बनला रेती माफियांचा ‘मध्यस्थ’अवैध रेती साठा जप्त करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात एका तलाठ्याने महत्त्वाची भूमिका बजावली. नायब तहसीलदाराने रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले तेव्हा हा तलाठी बाहेरगावी होता. ट्रॅक्टर- प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड भरलेल्या रेती मालकांनी त्याला संपर्क केला असता मी सुटीवरून येताच ‘अ‍ॅडजेस्ट’ करतो असे त्याने सांगितले. तो सुटीवरून आला मात्र अद्याप त्याला ‘अ‍ॅडजेस्टमेंट’मध्ये ‘यश’ आले नसल्याचे बोलले जाते. हा तलाठी यवतमाळच नव्हे तर लतगच्या राळेगाव, कळंब, आर्णी व अन्य तालुक्यातही अवैध रेती उत्खननात ‘मध्यस्थी’साठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे महसूल यंत्रणेत बोलले जाते.

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार