शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खत खरेदीसोबत आता शेतकऱ्यांना विमा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:22 IST

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी ...

ठळक मुद्देलाखाची मदत । कंपनी भरणार विमा हप्ता

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. अपघात झाल्यास अशा शेतकऱ्यांना एक लाख रूपयापर्यंतची मदत कंपनीच देणार आहे. विशेष म्हणजे, खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता खत कंपनीच अदा करणार आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ करण्यासोबत शेतकऱ्यांचा संकटकालीन सारथी म्हणून खत कंपनी भूमिका बजावणार आहे.शासनाच्या मालकीची इफको ही खत कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. खतांची खरेदी करणाºया शेतकऱ्यांना ही कंपनी एक लाख रूपयापर्यंतचा अपघात विमा देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलेही पैसे मोजावे लागणार नाही. एका पोत्याच्या खरेदीवर चार हजार रूपयापर्यंतचा सुरक्षा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. २५ पोत्यांवर एक लाख रूपयांचा सुरक्षा विमा या योजनेत जाहीर करण्यात आला आहे.२५ पोत्यांच्या खरेदीपर्यंतच ही मोहीम विमा कंपनी राबविणार आहे. ही योजना खरेदीच्या तारखेपासून एक महिन्याने शेतकऱ्यांना लागू होणार आहे. वर्षभरासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीला खत खरेदीची पावती दाखवावी लागणार आहे. खत खरेदीच्या पावतीवरूनच अपघात विम्याची नोंद कंपनी घेणार आहे.यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास १०० टक्के रक्कम इफको टोकियो ही विमा कंपनी शेतकऱ्यांना अदा करणार आहे. दोन पाय, दोन डोळे निकामी झाल्यास ५० टक्के रक्कम, एक पाय, एक हात, एक डोळा निकामी झाल्यास २५ टक्के रक्कम कंपनी देणार आहे. रेल्वे, रस्ता, पाण्यात मृत्यू, सर्पदंश, गॅस सिलिंडर स्फोट, इतर कुठलाही अपघात यासाठी ही पॉलिसी शेतकºयांना मदत करणार आहे.पोत्यामागे चार हजारांचा विमाखत कंपन्या एका पोत्यामागे चार हजारांचा सुरक्षा विमा देणार आहे. २५ पोत्यांपर्यंतच हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात २५ पोत्यांपर्यंत खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मोठे शेतकरीच २५ पोत्यांपर्यंत किंवा जादा खत खरेदी करतात. त्यामुळे ही विमा योजना लहान शेतकऱ्यांसाठी दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखीच ठरणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी