शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
2
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
3
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
4
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
5
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
6
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
7
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
8
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
9
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
10
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
11
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
12
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
13
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
14
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
15
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
16
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
17
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
18
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
19
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
20
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी आदेशाची एसटीकडून ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:36 IST

तिकीट चोरीच्या आरोपाची चौकशी वाहकाच्या निलंबन काळातच करण्याच्या आदेशाची एसटी महामंडळात ‘वाट’ लागली आहे. कित्येक वर्षे चौकशीत घालविली जात आहे.

ठळक मुद्देवाहकांचे अपहारप्रकरण : ९० दिवसातच निकाल लावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : तिकीट चोरीच्या आरोपाची चौकशी वाहकाच्या निलंबन काळातच करण्याच्या आदेशाची एसटी महामंडळात ‘वाट’ लागली आहे. कित्येक वर्षे चौकशीत घालविली जात आहे. या प्रकारात निलंबित वाहकाला दिल्या जाणाऱ्या अर्ध्या पगाराचा भुर्दंड महामंडळाला बसत आहे. अधिकाºयांच्या वेळकाढू धोरणामुळे महामंडळाच्या पैसा बचत धोरणाला हरताळ फासला जात आहे.तिकीट चोरी सापडलेल्या वाहकाला चौकशी अहवालावरून निलंबित केले जाते. या काळात वाहकाला अर्धा पगार दिला जातो. चौकशीचा कालावधी जेवढा वाढेल तेवढा वाहकाचा निलंबन कालावधी वाढतो. अपहार प्रकरणाची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करावी, असा महामंडळाचा आदेश आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती, हे अनेक प्रकरणात स्पष्ट झाले.निलंबन कालावधी ९० दिवसांचा असावा यासाठी एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक पी.डी. बिडकर (अमरावती) न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. या आधारे महामंडळाने २२ फेबु्रवारी २०१८ रोजी परिपत्रक काढून वाहकाच्या निलंबन काळातच चौकशी पूर्ण करण्याचा आदेश काढला. त्यावर अजूनतरी काही ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही.महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. चालक-वाहक नसल्याच्या कारणावरून बसफेऱ्या रद्द केल्या जातात. तिकीट चोरीच्या आरोपात काही वाहक दीड-दोन वर्षांपासून निलंबित आहेत. त्यांची प्रकरणे चौकशीतच अडली आहेत. प्रकरणे निकाली निघत नाही यासाठी विविध कारणे पुढे केली जातात. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केला जात नाही. आता ९० दिवसातच चौकशी करून निलंबन मागे घेण्याचा आदेश आहे. याचे पालन न केल्यास चौकशी अधिकाºयांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वेळकाढूपणाला चाप बसणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाºयांकडून बहुतांश प्रकरणात चालढकल केली जाते. याचा त्रास काही प्रकरणात प्रवाशांनाही सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ