शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्तिका क्रमांक १४७६ तयार करून त्याचे बिल सादर करण्यात आले.  मात्र सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या सतर्कतेमुळे या कामाचे बिंग फुटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील कवठा ते हिवरदरी रस्त्याच्या बनावट कामाचे मोजमाप पुस्तिका प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा परिषद  बांधकाम विभाग हादरून गेला आहे. या घटनेची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून वर्षभरातील एकूणच कामाची  समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्तिका क्रमांक १४७६ तयार करून त्याचे बिल सादर करण्यात आले.  मात्र सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या सतर्कतेमुळे या कामाचे बिंग फुटले. विभागीय स्तरावरून उचल करण्यात आलेल्या मोजमाप पुस्तिका आणि झालेल्या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबीए) रेकॉर्ड येथील बांधकाम उपविभागामध्ये नोंदच नाही. त्यामुळे विभागीय स्तरावरून आलेल्या मोजमाप पुस्तिका नेमक्या किती आणि कोणाला दिल्या, याचा ताळमेळ जुळत नाही. किती तरी मोजमाप पुस्तिका येथील बांधकाम उपविभागात नोंदल्या गेल्या नसल्याची बाबही आता पुढे येत आहे. यवतमाळ येथून उचल  करण्यात आलेल्या मोजमाप पुस्तिका संबंधित प्रभारी उपअभियंता एच.एम. कुमठे यांनी  उपविभागात नोंद न करता परस्पर जिल्हास्तरावर मंजूर करून घेतल्याची माहिती पुढे येत असून अशा काही प्रकरणाची कंत्राटदारांच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. परिणामी  कामाच्या बनावट मोजमाप पुस्तिकांची संख्या  बरीच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कवठा ते हिवरदरी रस्त्यामुळे उघडकीस आलेला प्रकार तालुक्यातील वर्षभरात झालेल्या इतरही कामांमध्ये असण्याची दाट शक्यता आहे.

आमदार म्हणाले, विधानसभेत आवाज उठविणार - येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत एकूणच विभागीय स्तरावरून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांच्या मोजमाप पुस्तिकांची तपासणी आणि कामाच्या गुणवत्तेबाबत विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासह कवठा ते हिवरदरी रस्त्याची पाहणी केली. 

कवठा ते हिवरदरी रस्त्याचे  कोणतेही देयक अदा करण्यात आले नाही. एकूणच कामाच्या चौकशीकरिता समिती नेमली जाईल.डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpwdसार्वजनिक बांधकाम विभाग