शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वाॅर्डमध्येच नवजात शिशूचा मृत्यू; डाॅक्टरांचा हलगर्जीपणा भोवला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

अंकिताला प्रसवकळा येत असल्याची माहिती नर्सला देवून उपचारासाठी डॉक्टरला बोलावण्याची विनंती केली. परंतु कोणीही उपचार केला नाही. अंकिताला प्रसूतीगृहात हलविण्याची सुध्दा तसदी काेणी घेतली नाही. प्रसूतीला वेळ आहे, असे सांगून दुर्लक्ष केले.  शेवटपर्यंत जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात आले.  शेवटी  जनरल वॉर्डमध्येच सकाळी ६ वाजता प्रसूती झाली. अंकिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचे वजनही सव्वातीन किलोच्या आसपास होते. परंतु सुरुवातीपासूनच्या उपचाराअभावी तिचे बाळ  २० मिनिटांनी मरण पावले. 

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : एका नवजात शिशूचा येथील  ग्रामीण रुग्णालयातील जनरल वाॅर्डमध्ये मृत्यू झाला. वारंवार विनंती करूनही डाॅक्टर उपचारासाठी आले नाहीत, शिवाय प्रसूतीगृहातही वेळेत न हलविल्याने मृत्यू झाल्याचे सांगत या हलगर्जीपणाबद्दल डाॅक्टरांसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.    अंकिता शिवाजी बेदरकर (२६, रा. तळवेल, ता. चांदुर बाजार) ही महिला बाळंतपणासाठी माहेरी कळंब येथे आली होती. मागील एक महिन्यापासून ती कळंब व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अंकिताला कळा यायला लागल्या, त्यामुळे तिला कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तिथे तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंकिताला प्रसवकळा येत असल्याची माहिती नर्सला देवून उपचारासाठी डॉक्टरला बोलावण्याची विनंती केली. परंतु कोणीही उपचार केला नाही. अंकिताला प्रसूतीगृहात हलविण्याची सुध्दा तसदी काेणी घेतली नाही. प्रसूतीला वेळ आहे, असे सांगून दुर्लक्ष केले.  शेवटपर्यंत जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात आले.  शेवटी  जनरल वॉर्डमध्येच सकाळी ६ वाजता प्रसूती झाली. अंकिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचे वजनही सव्वातीन किलोच्या आसपास होते. परंतु सुरुवातीपासूनच्या उपचाराअभावी तिचे बाळ  २० मिनिटांनी मरण पावले. नवजात बाळाचा हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे म्हणणे असल्याचेही संगीता मोहोळे यांनी कळंब पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. दुपारी ४ च्या दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. 

प्रथमदर्शनी हलगर्जीपणा कारणीभूत - वैद्यकीय अधीक्षक - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणी डॉ. प्रशांत कनाके व परिचारिका कृतिका गाडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठविला जाईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल