शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

रेशीम उत्पादकांवर होतोय प्रोत्साहन भत्त्यात अन्याय

By admin | Updated: October 30, 2015 02:22 IST

जिल्ह्यात व विदर्भात सध्या रेशीम (तुती) शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे.

शेतकऱ्यांची मागणी : आंध्र व कर्नाटकात मिळतो इन्सेंटिव्हयवतमाळ : जिल्ह्यात व विदर्भात सध्या रेशीम (तुती) शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. कमी खर्चात निश्चित उत्पादन मिळत असल्याने अनेक नवीन शेतकरी तुती लागवड करीत आहेत. शासनाकडून त्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासोबतच आंधप्रदेश व कनार्टक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेटिव्ह) मिळावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.यावर्षी रेशीम कोषाचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलेच गडगडले आहेत. शासकीय दर हा १६८ रुपये किलोच्या आसपास सुरू आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांचे मुख्य मार्केट असलेल्या रामनगर (कर्नाटक) येथील कोषाचा भाव मंगळवारी कमीतकमी १३० ते जास्तीतजास्त २६५ रुपये (सरासरी २१३) होते. यानंतर हैद्राबाद (आंध्रप्रदेश) हे एक दुसरे मार्केट यवतमाळसाठी जवळचे आहे. या ठिकाणी रामनगरपेक्षा नेहमीच ५० रुपये दर कमी असतो. म्हणजे या ठिकाणी सध्या दोनशे रुपयांच्या आसपास भाव सुरू आहे. एकीकडे रेशीम शेतीकडे शेतकरी वळत असताना दुसरीकडे भाव जर कोसळत असेल तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे सहाजिक आहे. आंधप्रदेश व कर्नाटकातील रेशीम शेतकऱ्यांना तेथील सरकारकडून प्रति किलो मागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ५० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, अशी शेतकऱ्यांची जुनीच मागणी आहे, परंतु याकडे यापूर्वीच्या सरकारने सतत दुर्लक्ष केले. आता नवीन सरकारने तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी रेशीम शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)