शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पेट्रोल पंपाने पोलीस कल्याण निधीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:02 IST

जिल्हा पोलीस दलाच्या कल्याण निधीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पुढाकारने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देमहिन्याकाठी तीन लाख : ‘एसपीं’च्या पुढाकाराने गॅस एजन्सीलाही मंजुरी

सुरेंद्र राऊत ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या कल्याण निधीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पुढाकारने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. यातून कल्याण निधी घसघशीत गंगाजळी जमा होत आहे. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याकाठी दोन लाख लिटर पेट्रोल विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आता लवकरच गॅस एजन्सी सुरू केली जाणार आहे.अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोलीस पेट्रोल पंपाचे फाईल पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी काही महिन्यातच निकाली काढले. १५ आॅगस्ट स्वातंत्र दिनाचा मुहूर्तावर हा पंप सुरू करण्यात आला. आॅगस्ट महिन्यातील १५ दिवसातच तब्बल ७२ हजार लिटर पेट्रोलची विक्री केली. त्यानंतर सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात प्रत्येकी एक लाख ५६ हजार लीटर तर नोव्हेंबर मध्ये एक लाख ८० हजार लिटर पेट्रोल विक्री केली. यातून महिन्याकाठी सर्व खर्च जाता साडेतीन लाखांचा नफा झाला. डिसेंबर महिन्यात दोन लाख लीटर पेट्रोल विक्रीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. हा पंप जिल्हा वाहतूक शाखेच्या नियंत्रणात चालविण्यात येत आहे. पेट्रोल पंपाला जोड म्हणून गॅस एजन्सीचाही परवाना घेण्यात आला आहे. त्याकरिता एमआयडीसी परिसरात गोदाम शोधले जात आहे.आता गॅस एजन्सीलासुध्दा मान्यता मिळाली असून काही जुजबी सोपस्कार पूर्ण केल्यानंतर कार्यान्वित केली जाणार आहे. या दोन्ही व्यवसायातून पोलिसांना हक्काचा निधी उभारता येणार आहे. ही दीर्घकालीन उपाययोजना जिल्हा पोलीस दलासाठी हितावह ठरणार आहे.मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेकपोलीस कल्याण निधीसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जात होते. या कार्यक्रमाचे तिकीट विक्री करण्याकरिता पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात येत होते. यातून अनेक गैरप्रकार झाल्याची उदाहरणे आहेत. शिवाय ही पध्दत पोलिसांची सामजिक प्रतिमा मलीन करणारी होती. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून यवतमाळातच रूजू होताच एम. राज कुुमार यांनी पेट्रोल पंपाचे फाईल बाहेर काढले. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून अल्पावधीतच हा पंप सुरू करून घेतला.