नेर एसटी आगाराच्या १८ फेऱ्यांचे उत्पन्न तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:56+5:30

कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने आगारातून एसटी बस बाहेर निघताना फवारणी करून निर्जंतूक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता दहा टक्केही रक्कम प्रवासी भाड्यातून मिळत नाही. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.

The income of 18 rounds of Ner ST depot is three thousand | नेर एसटी आगाराच्या १८ फेऱ्यांचे उत्पन्न तीन हजार

नेर एसटी आगाराच्या १८ फेऱ्यांचे उत्पन्न तीन हजार

Next
ठळक मुद्देप्रवासी नसल्याचा फटका : एसटी महामंडळाला डिझेल खर्चही परवडेना

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने २२ मेपासून हा निर्णय घेतला. नेर आगारातील आतापर्यंत बसच्या १८ फेºया झाल्या. यातून केवळ तीन हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे खर्च अधिक उत्पन्न कमी अशा स्थितीत बसेस चालवाव्या लागत असल्याचे दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने आगारातून एसटी बस बाहेर निघताना फवारणी करून निर्जंतूक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता दहा टक्केही रक्कम प्रवासी भाड्यातून मिळत नाही. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.
नेर आगारातून यवतमाळ, दारव्हा, बाभूळगाव येथे दिवसाला तीन बसफेºया सोडण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी २२ मे रोजी तीन हजार ७५२ रुपयांचे डिझेल लागले. ५५१ किलोमीटरचा प्रवास झाला व उत्पन्न आले ६६१ रुपये. दुसºया दिवशी एसटी बस २५९ किलोमीटर चालली, यात दोन हजार २७६ रुपये उत्पन्न आले. मात्र यावर १६ हजार ८८३ रुपयांचे डिझेल खर्च झाले. २४ मे रोजी १३६ किलोमीटरचा प्रवास झाला, सहा हजार ५६६ रुपयांचे डिझेल लागले व ९८० रुपये प्रवास भाडे आले. अशा स्थितीत एसटी महामंडळाला बसफेºया चालविणे प्रचंड तोट्याचे झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक दीपा वड्डे यांनी दिली.

गरिबांची लालपरी सातत्याने तोट्यात
आडवळणावरच्या गावखेड्यात पोहोचणारी गरिबांची लालपरी अर्थातच एसटी बस गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तोट्यात आली आहे. अनेक गावांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम एसटीच्या माध्यमातून होते. गावातील होतकरू तरुणांना रोजगारासाठी, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुका व जिल्हा मुख्यालयाला ने-आण करणारी एसटी बस ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. आता तिच अडचणीत आल्याने संकट वाढले आहे.

Web Title: The income of 18 rounds of Ner ST depot is three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.