शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकांना अपघात टाळण्यास प्रोत्साहन योजना : २० हजारापर्यंतची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:34 IST

Yavatmal : विना अपघात सेवेबद्दल एसटी चालकांना विशेष बक्षीस

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली एसटी महामंडळाची अपघातविरहित सेवा बक्षीस योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेच्या माध्यमातून चालकांना २० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च, असा या योजनेचा कालावधी राहणार आहे. यासाठी चालकांना २६० दिवस विना अपघात सेवा द्यावी लागणार आहे.

एसटी बसला अपघाताच्या संख्येत २०२० ते २०२४ या पाच वर्षात मोठी वाढ झाली. शिवाय अपघात नुकसान भरपाईची रक्कमही वाढली. तसेच एसटीची प्रतिमा नकारात्मक होऊ लागली. म्हणूनच अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

वर्धापनदिनी गौरवअपघातविरहित सेवा देऊन बक्षिसाकरिता पात्र ठरलेल्या चालकांचा महामंडळाचा वर्धापन दिन (१ जून) किंवा १५ ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे. 

बक्षिसाचे असे आहेत टप्पे

  • अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांसाठी बक्षिसाचे विविध टप्पे पाडण्यात आले आहेत.
  • चालकाने एक वर्षात २६० दिवस (स्टेअरिंग ड्यूटी) अपघातविरहित सेवा दिल्यास १,५०० रुपये बक्षीस मिळणार आहे.
  • सन २०२५-२६ची गणना १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ राहणार आहे. पाच वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना ५ हजार रुपये, १० वर्षांकरिता १० हजार, १५ वर्षांकरिता १५ हजार आणि २० वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना २० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना