शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
2
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
4
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
5
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
6
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
7
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
8
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
9
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
10
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
13
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
14
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
15
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
16
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
17
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
18
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
19
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
20
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

माळीपुऱ्यात लहान भावाने मोठ्याला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:00 AM

हिस्सेवाटणीवरून वाद घालत मंगळवारी सकाळी स्वत:च्या भावाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. घरासमोरच राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. या घटनेने माळीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. बाचलकर कुटुंबीय अक्षरश: हादरून गेले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. निपचित पडलेल्या राहुलला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन भावांतील मालमत्तेचा वाद विकोपाला पोहोचला. लहान भावाने काहीही न कळू देता, अचानक मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. कुटुंबीयांसमक्षच स्वत:च्या सख्ख्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजेदरम्यान माळीपुरा परिसरात घडली. राहुल मनोहरराव बाचलकर (३६), असे मृताचे नाव आहे. राहुल हा हार विक्रीचा व्यवसाय करीत होता. शहरातील मध्यभागी येत असलेल्या टांका चौक येथे राहुलचे व फूल व हार विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे तो अनेकांना परिचित आहे. त्याचा लहान भाऊ सतीश (३२) हासुद्धा  फूल विक्रीचाच व्यवसाय करतो. त्याने हिस्सेवाटणीवरून वाद घालत मंगळवारी सकाळी स्वत:च्या भावाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. घरासमोरच राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. या घटनेने माळीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. बाचलकर कुटुंबीय अक्षरश: हादरून गेले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. निपचित पडलेल्या राहुलला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी राहुलची पत्नी व आई प्रचंड आक्रोश करू लागल्या.शहर पोलिसांनी तत्काळ गुन्ह्यातील संशयित सतीश बाचलकर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी राहुलची पत्नी रिता यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात खुनाच्या घटनांत पुन्हा वाढ झाल्याने पाेलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

चार एकर शेतीचा वाद कारणीभूत  - राहुल व सतीश हे दोघे भाऊ फुलाचा एकत्र व्यवसाय करीत होते. याच व्यवसायातील नफ्यातून मादणी येथे चार एकर शेती घेतली. या शेतीची सोमवारीच दोन भावांत वाटणी करण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. मंगळवारी सकाळी राहुल त्याच्या जुन्या घरी आईकडे घरातील वस्तूंची मागणी करीत असताना आईसोबत त्याचा वाद झाला. यातच सतीशने घरातून चाकू आणून राहुलवर सपासप वार केले. पत्नी व मुले घटनेचे प्रत्यक्षदर्शी- राहुलची पत्नी रिता व तिची दोन मुले या खुनाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. संतापलेल्या सतीशने आपल्या सख्ख्या भावालाच चाकूने भोकसून काढले. त्याच्या तावडीतून पतीला सोडविण्यासाठी रिता जीवाच्या आकांताने आरडाओरडा करीत होती. कशीबशी सुटका केल्यावर जखमी पतीला घेऊन ती शासकीय रुग्णालयात पोहोचली. 

मारेगावपासून सुरू झाले खुनाचे सत्र - जिल्ह्यात ८ मेपासून खुनाचे सत्र सुरू आहे. दहा दिवसांत तब्बल सहा खून झाले आहेत. मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथे शेतकऱ्याचा गळा चिरून खून झाला. यातील आरोपी जेरबंद होत नाही तोच पाटीपुरा येथे वैभव नाईक याची नऊ जणांनी हत्या केली. येळाबारा येथे गळा आवळून एकाचा खून केला. नंतर मृतदेह दगडाने बांधून धरणात फेकून दिला. यातील आरोपी अद्यापही पसार आहे. शुक्रवारी रात्री पांढरकवडा रोडवर गांजाच्या व्यसनातून दगडाने ठेचून एकाचा खून झाला. यातील आरोपी मिळाले. मात्र, मृताची ओळख पटली नाही. त्यानंतर रविवारी रात्री पारवा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून झाला. हे सत्र आता किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी