शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे लसीकरण डेटा केवळ खानापूर्ती ; १४ जिल्हे, १३ पालिका रडारवर

By विलास गावंडे | Updated: July 22, 2024 17:30 IST

Yavatmal : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी

विलास गावंडेयवतमाळ : सहा महिन्यात लसीकरण झालेले एकही नवजात बालक गंभीर, अती गंभीर झाले नाही का, असा प्रश्न कुटुंब कल्याण विभागाने उपस्थित केला आहे. राज्यातील १४ जिल्हे आणि १३ महापालिकांनी सादर केलेल्या डेटातील 'शून्य' नोंद पाहून हा विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्हास्तरावरील या आरोग्य संस्थांनी केवळ खानापूर्ती केल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाविषयी सदोष नोंदी घेऊन बालकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

जन्मलेले बाळ, झालेले लसीकरण, लसीकरणानंतर गंभीर, अती गंभीर झालेले बाळ याची नोंद आरोग्य विभागाकडून ठेवली जाते. कुटुंब कल्याण विभागाला ही माहिती सादर करावी लागते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपला डेटा पुणे कुटुंब कल्याण कार्यालयाला सादर केला. या आरोग्य संस्थांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडविल्याचे स्पष्ट झाले आहे.एक लाख जिवंत अर्भक जन्मामागे कमीत कमी दहा गंभीर आणि अती गंभीर केसेसची नोंद व्हावी, अशा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु, १४ जिल्हे आणि १३ महापालिकांनी जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकही गंभीर आणि अती गंभीर केस नोंदविली नसल्याचे डेटामधून स्पष्ट झाले. हा डेटा पाहून कुटुंब कल्याण कार्यालयाने संबंधित यंत्रणेचे कान टोचले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही व्हावी, यादृष्टीने शून्य नोंद घेणाऱ्या जिल्हा आणि महापालिकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

कर्मचाऱ्यांची मोठी फौज

लसीकरणाचा डेटा तयार करण्यासाठी मोठी यंत्रणा नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हा डेटा तयार केला जातो. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे यावर नियंत्रण असणे अपेक्षित आहे. शिवाय अकोला विभागीय कार्यालयात नियंत्रणासाठी चार ते पाच अधिकारी व कर्मचारी आहेत. तरीही सदोष डेटा तयार केला जात आहे. ही बाब नित्याची झालेली असताना कुणावरही कारवाई होत नसल्याने यंत्रणेतील लोकांचे चांगलेच फावत आहे. 

एकही गंभीर केस न नोंदविलेले जिल्हेकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवितानाच एकही गंभीर आणि अंती गंभीर केस न नोंदविलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळचा समावेश आहे. शिवाय धुळे, जळगाव, नांदेड, परभणी, रत्नागिरी, सोलापूर जिल्हे याच रांगेत आहेत. अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, उल्हासनगर, पनवेल या महापालिकांनीही शून्य नोंदीचा डेटा पाठविला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र