शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अनैतिक संंबंध; चाकूने भोसकून एकाला केले ठार; तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 21:43 IST

गावातीलच विवाहित महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. तिला फूस लावून हैदराबाद येथून पळवून आणले. अन्सार शेख हा विवाहित असताना त्याने हे कृत्य केले. याचा राग आरोपी शेख मेहबूब शेख अजगर (२०), शेख नाजीर शेख अजगर (३०) या दोघांच्या डोक्यात होता. वारंवार समजूत काढूनही वर्तन सुधारत नसल्याने आरोपींनी संधी शोधली. बुधवारी सायंकाळी अन्सार शेख एकटा फिरत असताना त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जागीच ठार झाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एकाचा दोघांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना पुसद तालुक्यातील वनवार्ला येथे बुधवारी सायंकाळी घडली. घटनेतील आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तपास पथके नियुक्त करून गुरुवारी सकाळी एका आरोपीला अटक केली. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अन्सार शेख मुसा (४०, रा. वनवार्ला) याने गावातीलच विवाहित महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. तिला फूस लावून हैदराबाद येथून पळवून आणले. अन्सार शेख हा विवाहित असताना त्याने हे कृत्य केले. याचा राग आरोपी शेख मेहबूब शेख अजगर (२०), शेख नाजीर शेख अजगर (३०) या दोघांच्या डोक्यात होता. वारंवार समजूत काढूनही वर्तन सुधारत नसल्याने आरोपींनी संधी शोधली. बुधवारी सायंकाळी अन्सार शेख एकटा फिरत असताना त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी फिर्यादी ताहेरा बेगम शेख अन्सार यांच्या तक्रारीवरून कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित केले. पुसद व स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने रात्रीतून आरोपींचा नागपूर, आर्णी, पुसद, खंडाळा या परिसरात शोध घेतला. 

बान्सी येथे दडलेला आरोपी लागला हाती - आरोपी शेख मेहबूब शेख अजगर हा पुसद तालुक्यातीलच बान्सी येथे पोलिसांच्या हाती लागला. दुसरा आरोपी शेख नजीर शेख अजगर हा पसार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक डॉ. के.ए. धरणे, एसडीपीओ पंकज अतुलकर, एलसीबी प्रमुख प्रदीप परदेशी, ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गणेश इंगोले, जमादार मकसूद शेख, संदीप राठोड, गजानन फोपसे, धम्मानंद केवटे, चंदन जाधव, दानिश शेख, योगेश आळणे यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस