शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये रेतीचे अवैध साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:45 IST

तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देसाठेबाज मुजोर : कारवाईसाठी नागरिकांचे उपोषण, महसूल विभागावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.रेती व्यवसायात अल्पावधीत रग्गड पैसा मिळत असल्याने अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा या व्यवसायाकडे वळविला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. परिणामी तालुक्यात पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. तालुक्यातील तिवडी, साखरा, देवसरी, खरूस, चालगणी, गुरफळी, बोरी, ब्राह्मणगाव, दिघडी, कारखेड आदी ठिकाणी रेतीसाठे करण्यात आले. शहरातही ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊस, रहीमनगर, यूपीपी कॉलनी आदी परिसरात अवैध रेतीसाठे दिसून येत आहे.पैनगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून त्याचा साठा करण्यात आला. हे साठे जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने अखेर शुक्रवारपासून येथील शे. निसार, सतीश कोल्हे, दिगांबर मनवर, संभा भोयर, शेजमीर आदींनी उपोषण सुरू केले आहे.वरिष्ठ लक्ष देतील का ?उमरखेड तालुक्यातील अवैध रेती साठ्यांची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे. तथापि, रेती तस्कर दिवसाढवळ्या याच साठ्यातून रेतीची विक्री करताना दिसून येत आहे. महसूलकडून कठोर कारवाई होत नसल्याने रेती तस्कर निर्ढावले आहे. यामुळे आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कारवाई करतील का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :sandवाळू