शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

ग्रामपंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांचा सपाटा

By admin | Updated: December 30, 2014 23:45 IST

शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विना परवानगी घर बांधकाम करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करीत बांधकाम सुरू आहे.

पुसद : शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विना परवानगी घर बांधकाम करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करीत बांधकाम सुरू आहे. यातून ग्रामपंचायतीचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र राजरोस होणारे अवैध बांधकाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ यंत्रणाच नाही. पुसद शहरालगत काकडदाती, कवडीपूर, श्रीरामपूर, धनकेश्वर, गायमुखनगर, बोरगडी, निंबी, लक्ष्मीनगर आदी ग्रामपंचायती आहेत. पुसद शहर आणि या ग्रामपंचायतींची सीमारेषा आता पुसट होत चालली आहे. पुसद शहरात वाढते भाव लक्षात घेता आणि जागेची उपलब्धतता असल्याने अनेक जण ग्रामपंचायत क्षेत्रात घर बांधत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूर, काकडदाती, गायमुखनगर, लक्ष्मीनगर या क्षेत्रात बांधकाम व्यवसाय फोफावला आहे. बांधकामासाठी प्रथम ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असते. गृहकर्ज घेण्यासाठी ही परवानगी घेतली जाते. मात्र प्रथम चरणातील बांधकाम झाल्यानंतर पुढे होणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. प्लान इस्टीमेटमध्ये मंजूर बांधकामापेक्षा कितीतरी अधिक बांधकाम केले जात आहे. शहरालगतच्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये चौरसफुटामध्ये बांधकामाच्या परवानगीसाठी रक्कम आकारली जाते. ही रक्कम साधारणत: ५०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असते. मात्र अतिरिक्त बांधकाम विना परवानगीने होत असल्याने ग्रामपंचायतीचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे विना परवानगी ने होणाऱ्या या अवैध बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. प्लॉटमध्ये कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास नियमानुसार परवानगी घेणे गरजेचे असते. सरपंच, सदस्य यांच्याशी असलेल्या हितसंबंधामुळे या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे घरावर दुसरा मजला चढविताना तो अवैधपणे बांधल्या जातो. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बांधकामासाठी अशाप्रकारची परवानगी घेण्यात येत नाही. त्यातूनच अतिक्रमणासारखे प्रकार वाढले आहे. (तालुका प्रतिनिधी)