शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित

By admin | Updated: August 5, 2014 23:36 IST

आर्णी तालुक्याच्या सावळीसदोबा परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दुर्लक्षित आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जात नाही. आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

विविध समस्या : भारनियमनाशिवाय वीज पुरवठा खंडितसावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळीसदोबा परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दुर्लक्षित आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जात नाही. आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. महसूल आणि वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्यांना शेतीचे पट्टे मिळाले नाही. गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. भोगवट-२ च्या जमिनीचे भोगवट-१ मध्ये रूपांतर करण्यात आले नाही. दारिद्र्यरेषेखालील आदिवासी आणि बौद्ध बांधवांना सुटलेल्या पुरवणी यादीत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी पाऊस आणि पुराने खचलेल्या विविध दुरुस्तीसाठी मदत मिळाली नाही. यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आले आहे. सावळी-पळशी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी अपघातास निमंत्रण देत आहे. भारनियमनाशिवाय वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. अनेकांचे रेशनकार्ड जीर्ण झाले आहे. तहसील कार्यालय नसल्याने विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी पायपीट करावी लागते. पोलीस ठाणे नसल्याने गंभीर घटना घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास अडचणी येतात. या व इतर प्रश्नांना घेवून क्रांतिदिनी ९ आॅगस्टला येथील नायब तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास बेमूदत उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आणि जनता विकास आघाडीचे पदाधिकारी मुबारक तंवर यांनी येथे दिला. यावेळी अनेक नेते मंडळी मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)