शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेबिजचं इंजेक्शन घेतलंय, तर मग करू नका वर्षभर रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 18:36 IST

पुढचा धोका टळेल : दुर्धर आजार असणाऱ्यांनीही टाळावे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेकजण अजानतेपणी आपण स्वतः एखाद्या आजाराने ग्रस्त असतानाही किंवा आजाराबाबत औषधी सुरू असतानाही थेट रक्तदानासाठी जातात. याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होण्याचा धोका असतो. ज्यांना कुत्रा चावला व त्यांनी रेबिजचे इंजेक्शन घेतले अशांनी वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून पुढचा धोका होणार नाही.

काहीजण उत्साहाच्या भरात आपले आजार सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती रक्तदान करताना सांगण्याचे टाळतात. मात्र अशा व्यक्तीने रक्तदान केल्यास त्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान केल्यास हायपोग्लायसिमिया होण्याची भीती आहे. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कायम प्रतिबंध करण्यात आला आहे, तर रेबिज व इतर कुठल्या लसी घेतलेल्या व्यक्तीने किमान वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही. जी व्यक्ती धडधाकट आहे. तिला कुठलाही आजार नाही, औषधी सुरू नाही अशा व्यक्तीने आवर्जून रक्तदान करावे. त्यांना आणखी चांगले आरोग्य मिळते, शिवाय गरजूंना रक्त देऊन त्यांची मदत केल्याचे समाधान लाभते.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचेरक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताच्या एका बॅगपासून तीन रक्त घटक तयार होतात. सोबतच रक्तदान केल्याने नवीन पेशी तयार होते. हृदयरोग, रक्तदाब या आजारांची शक्यताही रक्तदात्यासाठी कमी होत जाते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या 

  • तीन दिवस अगोदर प्रतिजैविकं घेतलेली नकोत 
  • गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको
  • वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको
  • रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको
  • गत वर्षभरात श्वानदेश झालेला नको
  • गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको
  • रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदान ज्यांना सिकलसेल ब्लड कॅन्सर, एचआयव्ही, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असे आजार आहेत, त्या व्यक्तींनी रक्तदान करू नये, असे केल्यास त्याचा दुष्परिणाम रक्तदात्यावरच होण्याची शक्यता अधिक आहे.

१८ ते ६० वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदान

  • शारीरिक तंदुरुस्ती असणाऱ्यांनी वर्षातून तिनदा आवर्जून रक्तदान करावे. याचा फायदा स्वतःच्या शरीरावरही होतो.
  • रक्तदान केल्याने रुग्णाला जीवनदान दिल्याचे समाधान मिळते. त्यामुळे रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान असल्याचे मानले जात आहे.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोच्या पुढेरवत्तदान करण्यासाठी काही पात्रता ठरविण्यात आल्या आहेत. दात्याच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ असणे आवश्यक आहे, तसेच या व्यक्तीचे वजनही किमान ४५ किलोच्या पुढे असेल, तरच रक्तदान करता येते. रक्तदान केल्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तरुणांनी पुढे यायला हवे.

गर्भवतींना रक्तदान करता येते का?गर्भवती महिलांनी कुठल्याही परिस्थितीत रक्तदान करू नये. गर्भाची वाढ होत असताना, महिलांच्या शरीरातच पुरेशा रक्ताची गरज भासते. अशात रक्तदान केल्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो.

दर चार महिन्यांनी करता येईल रक्तदानएकदा रक्तदान केल्यानंतर किमान चार महिने रक्तदान करणे टाळावे. या कालावधीत शरीरात रक्ताचे प्रमाण संतुलित होते. चार महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करणे सुरक्षित ठरते.

"रक्तदान करून आपण थेट जीवनदान करण्याचे काम करतो. रक्त पिशवीतून तीन घटक वेगळे केले जातात. त्यामुळे एका दात्याच्या रक्तापासून तीन रुग्णांना रक्ताचा लाभ होतो. प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे."- डॉ. विशाल नरोटे, सहायक प्राध्यापक. 

टॅग्स :YavatmalयवतमाळBlood Bankरक्तपेढी