शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘आयकॉन्स’ समाजासाठी प्रेरक

By admin | Updated: June 10, 2017 01:07 IST

संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना ....

सुधीर मुनगंटीवार : लोकमत ‘कॉफीटेबल बुक’चे थाटात प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम ‘लोकमत’ने कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून केल्याचे गौरोद्गार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे काढले. हॉटेल ग्रॅन्ड महेफिलमध्ये रंगलेल्या ‘लोकमत आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याला ते विशेष पाहुण्याच्या भूमिकेतून संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, आमदार समीर कुणावर, आमदार वीरेंद्र जगताप तसेच लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. तत्पूर्वी अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील आयकॉन्सचा समावेश असलेल्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या शानदार कार्यक्रमाला ‘आयकॉन्स’, त्यांचे कुटुंबीय, तिन्ही जिल्ह्यांतील प्रतिष्ठित नागरिक आणि महत्त्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. जगाच्या पटलावर एकमेव भारतीय संस्कृती तग धरून आहे. ती टिकविण्यासाठी हजारोंचे परिश्रम कामी आले आहेत. ही एक निरंतर प्रक्रिया असल्याने यात स्वयंस्फूर्त योगदान देणाऱ्यांचे कौतुक व्हायलाच हवे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आयकॉन्सच्या कर्तृत्वाची नोंद घेतली. आभाळाएवढे कार्य समाजासमोर- ना.रणजित पाटील समाजाच्या विविध क्षेत्रांत मुशफिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे आभाळाएवढे काम समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स’ या ‘कॉफीटेबल बुक’ची संकल्पना आकारास आणली आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन प्रकाशित करण्यात आलेले हे ‘कॉफीटेबल बुक’ म्हणूनच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत ना. रणजित पाटील यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ शिवाय पहाट नाही- ना.प्रवीण पोटे आॅयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा या ‘कॉफीटेबल’बुकचे कौतुक करताना ‘लोकमत’शिवाय पहाटच उजाडत नाही. ‘लोकमत’ने वाचकांच्या हृदयात केव्हाचीच जागा मिळविली आहे. त्यांनी निवडलेले ‘आयकॉन्स’ही समाजाला यशपथ दाखविणारे असल्याचे उद्गार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी काढले. ‘लोकमत’साठीच नव्हे, देशासाठी महत्त्वाचा क्षण- विजय दर्डा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून जिद्दीने आणि पराक्रमाने ‘आयकॉन्स’ ठरलेल्यांचा हा गौरव सोहळा ‘लोकमत’साठीच नव्हे, तर राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा क्षण आहे, अशा शब्दांत लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी अमरावती, वर्धा आणि यवतमाळमधील आयकॉन्सना शुभेच्छा दिल्यात. सन २०११ पासून ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स कॉफीटेबल बुक’ची सुरूवात केली. यात बिझनेस आयकॉन्स, विमेन आयकॉन्स, एज्युकेशन आयकॉन्स अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववीरांची स्वतंत्र नोंद घेणारे कॉफीटेबल बुक्सचेही प्रकाशन केले गेले. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जीं, रतन टाटा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, स्मृती इरानी, अजय देवगन अशा अनेक दिग्गजांंनी कॉफीटेबल बुकच्या विविध प्रकाशन समारंभांना उपस्थिती दर्शविली. तोच धागा पुढे नेत अमरावती येथील प्रकाशन सोहळ्याला ना. सुधीर मुनगंटीवार, ना.प्रवीण पोटे, ना.रणजित पाटील हे मान्यवर उपस्थित असल्याचा आनंद विजय दर्डा यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नसून समाजपूरक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. त्याच भावनेतून कर्तृत्ववीरांच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली असल्याची भावना व्यक्त करून वाचकांच्या आशीर्वादाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रंगीबेरंगी प्रकाश किरणांनी न्हाऊन निघालेल्या, रेडकार्पेटने सुसज्ज अशा आलिशान दालनात आयोजित या शाही कार्यक्रमात ‘आयकॉन्स’ना कॉफीटेबल बुक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी गणेश देशमुख, सुशांत दांडगे आणि विकास मिश्र यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेगावकर, आभार प्रदर्शन लोकमत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजेश निस्ताने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित ‘आयकॉन्स’चे ग्रुप फोटोसेशनही करण्यात आले. यावेळी लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सखी मंचच्या यवतमाळ जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मेहमूद नाथानी, अविनाश साबापुरे, अतुल देशपांडे, संतोष कळसकर, वैभव टप्पे उपस्थित होते. असा रंगला ‘आॅयकॉन्स’ सोहळा प्रशस्त हॉलच्या प्रवेशद्वारापासून अंथरलेले ‘रेड कार्पेट’ प्रकाशन समारंभाचे ‘खास’ पाहुणे असलेले आॅयकॉन्स, त्यांचे कुटुंबिय, मोमॅन्टो आणि कॉफी टेबल बुकसह ‘आयकॉन्स’नी केलेले फोटोसेशन आणि आॅयकॉन्सचे मान्यवरांनी केलेले गोड कौतुक, ही ‘या ‘ग्रँड’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये.’ सायंकाळी ७ च्या सुमारास या ‘ग्रँड’ कार्यक्रमाला सुरूवात झाली. अगदी प्रवेशद्वारावर आॅयकॉन्सचे तुतारीच्या निनादात स्वागत करून ‘आॅयकॉन्स’चे गुलाबपुष्प देऊन फोटोसेशन करण्यात आले. व्यासपिठाच्या