शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आठ सेकंदात मी लढायचे ठरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:43 IST

खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता.

ठळक मुद्देआकाश चिकटे : भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक, अवघड आव्हानांचा केला सामना

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. मी ठरविले की पेनॉल्टी मारणाºया खेळाडूप्रमाणे आपण हालचाल करायची नाही, तर आपल्या हालचालीप्रमाणे त्याला हालचाल करण्यासाठी बाध्य करायचे. माझी ही चाल यशस्वी ठरली. बेल्जीयम संघाच्या सहा पैकी चार खेळाडूंच्या पेनॉल्टी मी सेव्ह केल्या व भारत ३-२ अशा गोल फरकाने विजयी ठरला.भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याने ‘लोकमत’शी बोलताना संघाच्या विजयातील गुपितं मांडली. भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धा आटोपून स्वगृही यवतमाळला आला असता त्याने संवाद साधला.आकाश म्हणाला, आॅस्ट्रेलिया संघासोबत बरोबरीनंतर इंग्लंड संघाकडून झालेला पराभव व जर्मनीविरूद्ध मिळालेला एकमेव विजय यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जीयम संघासोबत विजय मिळविण्याचे अवघड आव्हान होते. बेल्जीयम या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पाहिला जात होता. आम्ही व्यूहरचना आखली, तूल्यबळ लढत दिली. शेवटी सामना पेनॉल्टी कॉर्नरवर गेला. गोलरक्षक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती आणि ती पार पाडली.उपांत्य फेरीत अर्जेंटिना संघासोबतच्या सामन्यापूर्वी मूसळधार पाऊस झाल्याने कलिंगा स्टेडियममध्ये टर्फवर खूप पाणी जमा झाले होते. दोनही संघांच्या खेळाडूंची सामना खेळण्याची मानसिकता नव्हती. मात्र अर्जेंटीनाच्या कोचने कोणत्याही स्थितीत सामना खेळायचाच असा निर्णय घेतला. टर्फवर पाणी असतानाही आम्ही चांगली लढत दिली. परंतु संघाला पराभूत होण्यापासून वाचवू शकलो नाही. सामन्याच्या दिवशी पाऊस नसता तर निकाल वेगळा लागला असता, असेही आकाशने सांगितले. जानेवारीत न्यूझिलंड दौऱ्यासाठी संघ जाणार आहे. पुढील वर्षी आशिया कप, राष्ट्रकूल कॉमनवेल्थ गेम होत आहे. वर्ल्ड लीग स्पर्धेचा अनुभव या स्पर्धेत कामी येईल, असे आकाश म्हणाला.आंतरराष्ट्रीय सामन्यात दुर्मिळ कामगिरी४८ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आकाशने सडन डेथमध्ये सहा पैकी चार गोल अडविले. कोणत्याही देशाच्या गोलकिपरने आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी करणे फार दुर्मीळ आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी