शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पर्यावरणासाठी हायड्रोजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किंमतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर रेंज देणारी कार परवडणारी नाही. शहरात फिरण्यासाठी ती पर्याय ठरू शकते. सीएनजी कार परवडणारी आहे. पण सीएनजी स्टेशन नाहीत. 

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर कसा करता येईल यावर प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर चालणारी कार कसा पर्याय ठरू शकते, हे दाखविले आहे. मात्र यामध्ये सध्या अनेक अडचणी आहेत. हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर रेंज देणारी कार परवडणारी नाही. शहरात फिरण्यासाठी ती पर्याय ठरू शकते. सीएनजी कार परवडणारी आहे. पण सीएनजी स्टेशन नाहीत. 

इलेक्ट्रिक कार १६ लाखांपासून पुढेइलेक्ट्रिक कारमध्ये आता चांगली इफिशियन्सी देणाऱ्या कंपन्या येऊ लागल्या आहे. मात्र त्याच्या चार्जिंगची समस्या कायम आहे. घरी या कार पूर्णपणे चार्ज होत नाही. पुढे रेंज कमी मिळते. 

हायड्रोजन कार ५० लाखांपासून पुढेहायड्रोजन कार भारतात तयार होत नाही. त्यांना विदेशातून आयात करावी लागते. कारच्या किमतीवरून आयात शुल्क निश्चित केले जाते. त्यामुळे या कार खूप महाग आहे. सध्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही. 

इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रती किमी दीड रुपयाएका चार्जिंगमध्ये ३०० किलोमीटरची रेंज ही कार देते. चार्जिंगचा खर्च ४०० रुपये येतो. दीड रुपया प्रतिकिलोमीटर लागतात. 

हायड्रोजन फ्यूएलचे दरच निश्चित झाले नाहीहायड्रोजन फ्यूएल किलोमध्ये लिटरमध्ये मिळणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे याचे दर निश्चित नसल्याने खर्चही सांगता येत नाही. 

सीएनजी अवाक्यात, तेही महाग होतेय 

पेट्रोलपेक्षा सीएनजी पर्यावरणपूरक आहे. एक किलो गॅसमध्ये ४० किलोमीटरची रेंज मिळते. नागपूरला ६०० रुपयात जाणे-येणे शक्य आहे. मात्र रेट्रोफिमेंट सेंटर आपल्याकडे नसल्याने ही वाहने वापरताना अडचणी आहे. 

किमती आवाक्यात आल्या तरच खरेदी

पर्यावरणपूरक वाहने काळाची गरज आहे. मात्र वापरताना त्याच्या किमती, इंधन सहज उपलब्ध होणेही आवश्यक आहे. - बाळासाहेब देशमुख

इलेक्ट्रिक कार चांगला पर्याय ठरू शकते. त्यासाठी चार्जिंग स्टेशन हवे. कारची इफिशियन्सी वाढविण्यात यावी.       - मंगेश शिरभाते

 

टॅग्स :carकारElectric Carइलेक्ट्रिक कार