शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पती- पत्नीची आत्महत्या; दसऱ्या सारख्या सणाच्या दिवशी गावात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 15:17 IST

महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील रहेमान फाट्याजवळ सार्वजनिक विहिरीत फकीरा गणपत पिटलेवाड (वय 22 वर्षे) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी विहिरीवर पाणी भरण्यात गेलेल्या नागरिकांना निदर्शनास आला.

यवतमाळ: महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील रहेमान फाट्याजवळ  सार्वजनिक विहिरीत फकीरा गणपत पिटलेवाड (वय 22 वर्षे) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी विहिरीवर पाणी भरण्यात गेलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांना संबंधित प्रकार लक्षात येताच मृतकाचे पत्नी निलाबाई फकीरा पिटलेवाडला कळताच तिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. 

गेल्या चार दिवसा अगोदर पत्नी व आई हे मृतकाच्या सासरवाडीला काही कामानिमित्त गेले होते. ते काल सायंकाळी गावात आले. मात्र त्यांना फकीरा घरी दिसला नाही. त्यामुळे आईने  तो जिथे मोलमजूरीची कामे करतो तिथे चौकशी केली असता, तो आज दिवसभर आलाच नसल्याचे सांगण्यात आले.  त्यामुळे दोघी सासु सुन फकीराची वाट पाहून पाहून झोपी गेल्या.  सकाळी गावात सार्वजनिक विहिरीत एक पुरुष जातीचे मृतदेह तरंगत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी  गावात पसरली.  काही लोकांना संशय आल्यामुळे हि गोष्ट मृतक फकीरा च्या आईला सांगण्यात आली. आईने विहिरीवर जाऊन बघितल्यानंतर हंबरडा फोडला.

विहिरीतील मृतदेह फकिराचा असल्याचे निश्चित झाल्यानंतर या घटनेची माहिती त्याची पत्नी निलाबाई फकीरा पिटलेवाड (वय 25 वर्षे ) हिला मिळाली.  तिला पती आता या जगात नाही ही वार्ता कळताच विरहाच्या कल्पनेनेच  तिने  राहत्या घरात दोराच्या सहाय्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली. दसरा सणाच्या दिवशी पती-पत्नी दोघांचाही हा करून अंत पाहतात गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला, कुटुंबा त्यात एकट्याच राहिल्या आहेत.पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून महागावचे ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी संगेपल्लू व बीट जमादार विलास राठोड पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळSuicideआत्महत्या