लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूड्या पतीने पत्नीला १३ ऑगस्ट २०१८ रोजी रॉकेल टाकून जिवंत जाळले. मुलाच्या साक्षीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा हा खटला खुनात परावर्तीत केला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांनी शनिवारी आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.विनोद गुलाबराव अरसोड (३६) रा. तरनोळी ता. दारव्हा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याबाबत आरोपीला नोतवाईकांनी अनेकदा समज दिली होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही. १३ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी विनोदने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालून तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना लोहारा पसिरातील घरात घडली. या प्रकरणी विनोद कणसे यांच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात अवधुतवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०६, ३०४ (ब), ४९८ (अ) नुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यात सहायक सरकारी वकील अॅड. एस.व्ही. दरणे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस जमादार दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.पित्याविरुद्ध मुलाची साक्ष ठरली महत्त्वाचीप्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्यात मुलाची साक्ष ग्राह्य धरून आरोपीविरूद्ध न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याचे कलम ३०२ समाविष्ट केले. मुलाची साक्ष ग्राह्य मानत आरोपीला जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे मुलाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST
विनोद गुलाबराव अरसोड (३६) रा. तरनोळी ता. दारव्हा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याबाबत आरोपीला नोतवाईकांनी अनेकदा समज दिली होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही. १३ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी विनोदने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालून तिला मारहाण केली.
पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेप
ठळक मुद्देसंडे अँकर । रॉकेल टाकून पेटविले, दोन वर्षांपूर्वीची घटना