शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरात शंभरावर वाहनांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून चाेरट्यांचा धुमाकूळ : पाेलीस उरले केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  शहरसह जिल्ह्यात दुचाकी चाेरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात शंभरावर वाहने चाेरीला गेली आहेत. यवतमाळात दर दिवशी पाच ते सहा वाहने चाेरीला जात आहेत. पाेलीस केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरतीच भूमिका वठवत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार थेट दाखल करून घेतली जात नाही, त्यामुळे दर दिवशीचे प्रमाण रेकाॅर्डवर कमी दिसत आहे. चाेरटे सैराट झाल्याने सामान्य नागरिक हैराण आहेत.  दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे. दुचाकी सापडल्यास ती तक्रार नाेंदविल्यावर सहज परत करता येत नाही, असे सांगून परत पाठविले जाते. दुचाकी गेल्याचे दु:ख घेऊन त्या व्यक्तीलाच स्वत:च्या गाडीचा शाेध घ्यावा लागताे. शाेधाशाेध करून ती सापडत नाही. मात्र, पाेलीस ठाण्यातील हा अनुभव आल्यानंतर बरेच जण पुन्हा तक्रार देण्यासाठी जात नाही, त्यामुळे अनेक गुन्हे रेकाॅर्डवर येत नाहीत. शहरासह ग्रामीण भागातही दुचाकी चाेरटे सक्रिय आहे. महगाव, उमरखेड, पुसद, आर्णी या तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चाेरीचे गुन्हे घडत आहे. अनलाॅकच्या प्रक्रियेत गुन्ह्याचा आलेख वाढणार, ही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तविली हाेती. आता याची प्रचिती येत आहे. चाेरीच्या दुचाकीचा वापर हा विविध गुन्ह्यांमध्ये केला जाताे, अशा घटनाही घडत आहेत. 

चाेरट्यांना माेकळे रान

- यवतमाळ शहरातील शहर पाेलीस ठाणे, अवधूतवाडी पाेलीस ठाणे, ग्रामीण व लाेहरा पाेलीस ठाण्यातही चाेरीचे गुन्हे दाखल हाेत आहे. दुचाकी चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काेणतीच ठाेस उपाययाेजना पाेलिसांकडून प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळेच चाेरट्यांचे फावत आहे.  अनेक प्रमुख चाैकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहे. या कारणाने अनेक घटना उघडकीस येत नाही. किमान सीसीटीव्ही सुरू असल्यास चाेरट्यांच्या टाेळीचा झडा लागण्याला मदत हाेईल, असे जाणकार पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस