शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

तंबाखूमुक्तीसाठी आता शेकडो माध्यमिक शाळा ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:41 IST

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे.

ठळक मुद्देसंकल्प : शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात काही समन्वयकाची निवडही करण्यात आली आहे. त्यामुळे तंबाखुयुुक्त खºर्याचे सेवन करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.सलाम फाउंडेशनने तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा बनविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड केली. प्रथम टप्प्यात प्राथमिक शाळांमध्ये जनजागृती करून तंबाखूमुक्तीची चळवळ गावागावांत पोहोचविली. शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी या चळवळीला बळकटी देऊन शिक्षकांना आवाहन केले. शिक्षकांनी त्याला प्रतिसादही दिला. काही चिमुकल्या मुलींनी आपल्या पालकांनासुद्धा तंबाखू सोडण्यास बाध्य केले. अशा विद्यार्थिनी व पालकांचा सलाम फाउंडेशनने सत्कारही केला आणि वर्षभरात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला. या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली.जिल्ह्याला शासनाने गौरवपत्र बहाल केले. कागदोपत्री का होईना पण सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्या. आता यावर्षी माध्यमिक शाळांना तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास फाउंडेशनने घेतला. नव्याने जिल्ह्यात आलेले शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनीही या चांगल्या उपक्रमाला उचलून धरले आहे. त्यासाठी १ जुलै ते ३१ मे २०१८ पर्यंत तंबाखूमुक्त अभियानांतर्गत राबवायच्या विविध कार्यक्रमाचे वार्षिक नियोजन करून देण्यात आले आहे. शासनाने तंबाखू नियंत्रण कायदा २००३ हा अध्यादेश काढला आहे.या अध्यादेशातील कलम २३ नुसार शालेय परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ हाताळणाºया, विक्री करणाºया किंवा सेवन करणाºया व्यक्तीवर २०० रूपये दंड ठोकण्याचे अधिकार मुख्याध्यापकांनाच देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेले तंबाखूमुक्त शाळांसाठी ११ निकष ठरवून देण्यात आले आहेत.शाळांनी प्रत्येक निकष पूर्ण केल्याचा पुरावा ‘टोबॅको फ्री स्कूल’ या अ‍ॅपमध्ये अपलोड करावयाच्या आहे. अकराही निकषांची पूर्तता झाल्यानंतरच संबंधित शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित केले जाणार आहे.तंबाखू सेवनाने दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यूदेशात २९ टक्के, तर महाराष्ट्रात २७ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. भारतात दररोज २५०० लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. जगात तंबाखूमुळे होणाºया तोंडाच्या कँसरचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहे. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल तंबाखूचे पहिल्यांच सेवन करते.