शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोरींची भरारी ! एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 20:07 IST

Yavatmal News :अवकाशात एखादाही उपग्रह प्रक्षेपित करणे आव्हानात्मक मानले जाते. मात्र येत्या ७ फेब्रुवारीला एकाच वेळी शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - अवकाशात एखादाही उपग्रह प्रक्षेपित करणे आव्हानात्मक मानले जाते. मात्र येत्या ७ फेब्रुवारीला एकाच वेळी शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे आव्हानात्मक काम यवतमाळ जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील ३० आदिवासी विद्यार्थिनी करणार आहेत. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या जिजाऊ जयंतीनिमित्त या महाराष्ट्र कन्यांच्या पराक्रमाची ही कहाणी. अशा प्रकारचा उपक्रम जगात पहिल्यांदाच होत असून त्याची जागतिक विक्रम म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे.उपग्रहांचे शतक ठोकणाऱ्या या विद्यार्थिनी यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरातील रहिवासी आहेत. ह्यहाऊस ऑफ कलामह्ण, ह्यस्पेस झोन इंडियाह्ण आणि मार्टीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अब्दुल कलाम आझाद इंटरनॅशनल फाऊंडेशनने या उपक्रमाची आखणी केली आहे. ह्यडॉ. अब्दुल कलाम आझाद स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज-२०२१ह्ण असे या मोहिमेचे नाव आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला होता. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाच्या बाबतीत जिज्ञासा वाढेल, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल असा उद्देश आहे. यात देशभरातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्यात महाराष्ट्रातील शंभर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या शंभर जणांपैकी ३० जण एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याहून अभिमानास्पद बाब म्हणजे या ३० जणांपैकी २४ खेड्यापाड्यातील आदिवासी मुली आहेत. त्या सर्व पाटणबोरी येथील रेड्डीज् कॉन्व्हेन्ट व कॉलेजमध्ये ह्यनामांकित इंग्रजी शाळाह्ण योजनेअंतर्गत निवासी शिक्षण घेत आहे.निवड झाल्याबाबत फाऊंडेशनने रेड्डीज्‌ कॉन्व्हेन्टला पत्र पाठविले असून विद्यार्थिनींना चेन्नई येथे उपग्रहाबाबत प्रशिक्षणही दिले. आता या विद्यार्थिनींकडून १८ ते २२ जानेवारीपर्यंत चेन्नई, पुणे व नागपूर येथे उपग्रहांची प्रत्यक्ष जुळवणी व कोडींग केली जाणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारीला एकाच वेळी शंभर उपग्रहांचे सायन्टीफीक हेलीयम बलून द्वारे अंतराळात प्रक्षेपण केले जाणार आहे. हे उपग्रह पृथ्वीपासून ३८ हजार मीटरवर स्थापित केले जाणार आहे. त्यानंतर अंतराळातून पृथ्वीवर स्थापित केलेल्या केंद्राशी कशा प्रकारे संपर्क होतो, अंतराळातील ओझोनचा थर, कार्बन डाय-ऑक्साईड व तत्सम बाबींचा ऑनलाईन सूक्ष्म अभ्यास करण्याचा अनुभव या विद्यार्थिनींना घेता येणार आहे. या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया ग्रुप ऑफ रेकॉर्ड आणि वर्ड बुक ऑफ रेकॉर्डची चमू उपस्थित राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपराष्ट्रपती देखील उपस्थित राहणार आहे. 

पाटणबोरीसारख्या आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थिनींना थेट उपग्रह प्रक्षेपणाचा अनुभव मिळणे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. फाऊंडेशनचे ठाणे येथील महासचिव मिलिंद चौधरी व समन्वयक मनीषा चौधरी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. भरीव सहभागाबद्दल डॉ. अब्दुल कलाम आझाद यांच्या ९२ वर्षीय बंधूंनी आम्हाला पत्र पाठवून कौतुक केले.- सुरेश रेड्डीअध्यक्ष, रेड्डीज्‌ कॉन्व्हेन्ट, पाटणबोरी. उपक्रमात सहभागी पाटणबोरीच्या बालवैज्ञानिकएकाच वेळी शंभर उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या जगातील पहिल्याच उपक्रमात पाटणबोरी येथील रेड्डीज्‌ कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थिनी बालवैज्ञानिक म्हणून सहभागी होत आहे. त्यामध्ये मानसी घोडाम, वैजयंती चिकराम, सुप्रिया पांढरे, गौरी सुरेशरेड्डी कॅतमवार, वैष्णवी बोलचेट्टीवार, शुभांगी कुलसंगे, सुहानी घोडाम, पूजा पुसनाके, देवर्षी आत्राम, दीक्षा धुर्वे, सरिता कोडापे, बेबी गेडाम, रेणुका कनाके, मयुरी पुसनाके, पूजा तुमराम, कुमार रेड्डी कॅतमवार, भारतचंद्र गौड कोदुरी, पल्लवी मडावी, निखील शाहाकार, रुपेश लक्षट्टीवार, दीक्षा गेडाम, प्रियंका आत्राम, दिव्या किनाके, निकिता घोडाम, साक्षी गेडाम, सानिया कनाके, वैष्णवी कुमरे, जागृती पेंदोर, कीर्ती मडावी, पूनम नैताम यांचा समावेश आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रYavatmalयवतमाळ