शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:34 IST

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देशिरपूर ग्रामपंचायतीचा प्रताप : रोप लागवडीचा उडविला बोजवारा, शासनाच्या उद्देशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. यापैकी एक हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी कनाके यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ५०० पेक्षा अधिक झाडांची लागवड झाली नसल्याची बाब एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितली. एक हजार रोपांची लागवड केल्यानंतर उर्वरित २०० पैकी १०० झाडे गावात वाटण्यात आली. त्यातील उरलेली १०० झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने ती फेकण्यात आली, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करून वृक्ष लागवडीबाबत वेगवेगळ्या आकड्यांचा खेळ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रोपे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत ठेवण्यात आली होती. या रोपांची ग्रामपंचायतीने अखेरपर्यंत लागवडच केली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ती सुकून गेली.६ नोव्हेंबरला शिरपूर येथे पाणी विषयात शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे वृक्ष लागवडीबाबतचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ग्रामपंचायतीने ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ही रोपे एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन ती शिरपूरलगतच्या तलावात फेकून दिली. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.गेल्या काही वर्षात निसर्गाचा असमतोल निर्माण झाला. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताच वृक्ष लागवडीची मोठी मोहिम हाती घेण्यात आली. त्यानुसार शिरपूर ग्रामपंचायतीलाही एक हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु मुळातच या विषयात अनास्था असलेल्या ग्रामपंचायतीने या योजनेचा पार बोजवारा उडवून टाकला. ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या रोपांपैकी किती झाडे जगलीत, असा प्रश्न विचारल असता, त्याचे उत्तरही सरपंच मिनाक्षी कनाके देऊ शकल्या नाहीत. माहिती घेऊन सांगते, असे ‘टीपीकल’ उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.शिरपूर ग्रामपंचायतीला एक हजार २०० वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार झाडे ग्रामपंचायतीने लावली. उर्वरितपैकी काही झाडे गावात वाटण्यात आली, तर काही सुकून गेल्याने ती फेकण्यात आली. नेमकी किती झाडे सुकली, हे सांगता येणार नाही.- मिनाक्षी कनाके, सरपंच, शिरपूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच