शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या अनुदानाचे साडेचार कोटी रखडले

By admin | Updated: September 28, 2015 02:46 IST

सिंचनाकरिता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या हेतुने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक, तुषार संच बसविले. काहींनी बँकेचे कर्ज घेऊन संच खरेदी केले.

कृषी विभागाची दिरंगाई : दारव्हा उपविभागातील स्थिती बिकट दारव्हा : सिंचनाकरिता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या हेतुने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक, तुषार संच बसविले. काहींनी बँकेचे कर्ज घेऊन संच खरेदी केले. मात्र कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईने दारव्हा कृषी उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे सुमारे साडेचार कोटी रुपये रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. शेती व्यवसायामध्ये पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही पिकास जमिनीत ओलावा उपलब्ध असल्याशिवाय पीक घेता येत नाही किंवा वनस्पतींची वाढ होणे शक्य होत नाही. दिवसेंदिवस निसर्गचक्रात होत असलेल्या बदलमाुळे पावसातील खंड, अवेळी व जास्त पाऊस, जमिनीतील खालावत असलेली पाण्याची पातळी या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांनी मोकाट सिंचन बंद करून ठिबक व तुषार सिंचनाचा मार्ग अवलंबिला आहे. पाण्याचा योग्य व कार्यक्षम वापर व्हावा या उद्देशाने शासनाचे या संचाला अनुदान आहे. संच खरेदी केल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होणे अपेक्षित असते. परंतु कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे कृषी उपविभागातील दारव्हा, नेर, आर्णी व बाभूळगाव या चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानाचे सुमारे साडेचार कोटी रुपये बराच कालावधी होऊनही न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आवश्यक असलेल्या अनुदान अदायगीकरिता उपविभागाकडून जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी अनुदान अद्याप उपलब्ध झाले नसल्याचे कृषी विभागाच्या जिल्हासुत्रांचे म्हणणे आहे. दारव्हा तालुक्यातील ७७१, नेर तालुक्यातील २९४, आर्णी तालुक्यातील २५५ तर बाभूळगाव तालुक्यातील ५०८ शेतकऱ्यांच्या अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. परिसरात गत दोन-तीन वर्षात झालेल्या नापिकीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेकडून ठिबक व तुषारसाठी कर्ज घेतले आहे. अनुदान वेळेत न मिळाल्याने कर्जाच्या रकमेचा भरणा शेतकऱ्यांना करता येऊ शकत नसल्याने परिणामी या रकमेवरील व्याज वाढत असल्याने आर्थिक भुर्दंड त्यांना बसत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष पुरवून अनुदान त्वरित उपलब्ध करावे, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)मोका तपासणीत दारव्हा माघारलेउपविभागातील चार तालुक्यांमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचे प्रस्ताव दारव्हा तालुक्यात प्रलंबित आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याला पाठविलेल्या आकडेवारी वरून ते स्पष्ट होते. दारव्हा मंडळमधील कामचुकार प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे ही मोका तपासणीची कामे मागे राहिल्याची ओरड शेतकऱ्यांमधून ऐकावयास मिळत आहे. कृषी कार्यालयाची पूर्वसंमती घेऊन शेतकऱ्यांनी संच बसविल्यानंतर त्वरित मोका तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्यास पुढील प्रक्रिया जलद होते. परंतु दारव्ह्यात ही प्रक्रिया मंदावली आहे. त्वरित मोका तपासणी करायची असल्यास खासगी वाहनाकरिता डिझेलची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.